England Test Squad for Pakistan Tour : इंग्लंडचा संघ काही आठवड्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने आपला 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन करणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी खूप महत्त्वाची असेल, ज्यांच्या टेबलमध्ये इंग्लंड सहाव्या आणि पाकिस्तान आठव्या स्थानावर आहेत.


जॅक क्रॉली बोटाच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळत नव्हता, पण पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठीही तो परतला आहे. पाकिस्तानी खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजी खूप महत्त्वाची ठरेल, त्यामुळेच शोएब बशीरशिवाय इंग्लंडने रेहान अहमद आणि जॅक लीचचाही आपल्या संघात समावेश केला आहे. यावर्षी भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांमध्ये 22 बळी घेणाऱ्या टॉम हार्टलीला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.


20 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज जोश हलने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून पदार्पण केले. त्याला पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची संधीही मिळणार आहे, तर ब्रायडन कारसे आणि जॉर्डन कॉक्स या दोन अनकॅप्ड खेळाडूंचाही इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे कर्णधार बेन स्टोक्सही या मालिकेत परतला आहे.


सामने कुठे होणार हे नाही स्पष्ट


पाकिस्तानातील कराची, रावळपिंडी आणि लाहोर या तीन मोठ्या स्टेडियममध्ये मैदानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या कारणास्तव, पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना कुठे खेळवला जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. अलीकडेच, पाकिस्तान-इंग्लंड सामने यूएई किंवा श्रीलंकेत होऊ शकतात, अशी बातमीही आली होती. दुसरीकडे, पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे सामने आपल्या घरच्या मैदानावर घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.


पाकिस्तान मालिकेसाठी इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, जोश हल, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स.


हे ही वाचा -


Babar Azam : यापेक्षा वाईट काय होणार? बाबर आझमला एका मुलाने केलं क्लीन बोल्ड, Video होतोय Viral


AFG vs NZ : "वॉशरुमच्या पाण्याने बनवलं जेवण... BCCI झोपलय का?", स्टेडियमविरोधात का घेत नाही ॲक्शन; जाणून घ्या Inside स्टोरी


Paris Paralympics Medal Winners Prize Money : भारत सरकारने उघडला गिफ्ट बॉक्स, पॅरिस पॅरालिम्पिकमधील पदक विजेत्यांवर पैशांचा वर्षाव