Babar Azam Video Viral : प्रत्येक फलंदाजाच्या कारकिर्दीत एक असा टप्पा येतो जेव्हा तो एक एक रन काढण्यासाठी तरसत असतो. असेच काहीसे आता बाबर आझमच्या बाबतीत घडत आहे, ज्यांच्यासाठी 2024 हे वर्ष दुःस्वप्नासारखे गेले. तिन्ही फॉरमॅटचा विचार केला तर पाकिस्तानचा एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार बाबरची सरासरी केवळ 33.6 आहे. आता एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार एका मुलाविरुद्ध क्लीन बोल्ड झाला आहे.


एका चाहत्याने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी कर्णधार लोकल स्पर्धेत खेळताना दिसत आहे. समोर डावखुरा ऑफ-स्पिन गोलंदाज मोहम्मद असगर आहे, ज्याने बाबर आझमला क्लीन बोल्ड केले आहे. असगरचा चेंडू बाबरने स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटखाली जाऊन मधल्या स्टंप उडला.


बाबर आझमचा हा व्हिडीओ अशावेळी समोर आला आहे, जेव्हा 12 सप्टेंबरपासून पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स वनडे चषक सुरू होत आहे. ही स्पर्धा 12 ते 29 सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाईल, त्यानंतर पाकिस्तान संघाला इंग्लंडसोबत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पाकिस्तानला पुढच्या मालिकेत चांगली कामगिरी करायची असेल, तर बाबरला फॉर्ममध्ये परतणे आवश्यक आहे. या खराब लयमुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणीही जोर धरू लागली होती.


बाबर आझम एकदिवसीय चषकमध्ये कोणत्या संघासोबत खेळणार?


पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स एकदिवसीय चषक 12 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 29 सप्टेंबरपर्यंत चालेल. या स्पर्धेत एकूण 5 संघांचा समावेश करण्यात आला आहे. बाबर आझम स्टॅलियन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे, ज्याचे नेतृत्व मोहम्मद हरिस करणार आहे. या संघात हारिस रौफ, आझम खान, साद खान आणि शान मसूद देखील खेळताना दिसणार आहेत.




हे ही वाचा -


AFG vs NZ : "वॉशरुमच्या पाण्याने बनवलं जेवण... BCCI झोपलय का?", स्टेडियमविरोधात का घेत नाही ॲक्शन; जाणून घ्या Inside स्टोरी


Paris Paralympics Medal Winners Prize Money : भारत सरकारने उघडला गिफ्ट बॉक्स, पॅरिस पॅरालिम्पिकमधील पदक विजेत्यांवर पैशांचा वर्षाव


वॉशरूमच्या पाण्यापासून बनवलं जेवण? जगभरात BCCIची नाचक्की, AGF vs NZ मॅच दुसऱ्या दिवशीही रद्द