Paris Paralympics Medal Winners Prize Money : ८ ऑगस्टला पॅरिस पॅरालिम्पिकची सांगता झाली. यावेळी भारताने पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आणि 29 पदके जिंकली. ज्यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत आता पॅरालिम्पिक पदक विजेत्यांना भारत सरकार गिफ्ट देणार आहे. क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी पदक विजेत्यांना निधी देण्याची घोषणा केली आहे.
क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना रोख पारितोषिके जाहीर केली. ज्यात सुवर्णपदक विजेत्यांना 75 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना 50 लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्यांना 30 लाख रुपये देण्यात येतील.
तिरंदाज शीतल देवीसारख्या मिश्र सांघिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 22.5 लाख रुपये मिळतील. पदक विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी आयोजित एका भव्य कार्यक्रमात क्रीडामंत्र्यांनी ही घोषणा केली. 2028 लॉस एंजेलिस पॅरालिम्पिकमध्ये अधिक पदके जिंकण्यासाठी पॅरा ॲथलीट्सना पूर्ण पाठिंबा आणि सुविधा देण्याचे आश्वासनही मांडविया यांनी दिले.
क्रीडा मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, “देश पॅरालिम्पिक आणि पॅरा स्पोर्ट्समध्ये पुढे जात आहे. 2016 मध्ये 4 पदक जिंकणाऱ्या भारताने टोकियोमध्ये 19 पदके आणि पॅरिसमध्ये 29 पदके जिंकली. आम्ही आमच्या सर्व पॅरा ऍथलीट्सना सर्व सुविधा देऊ जेणेकरून 2028 लॉस एंजेलिस पॅरालिम्पिकमध्ये भारत अधिक पदके आणि सुवर्णपदके जिंकेल.
भारताने पॅरिस पॅरालिम्पिकमधील आपल्या ऐतिहासिक मोहिमेची सांगता 29 पदकांसह केली, ज्यात सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे, ही स्पर्धेच्या इतिहासातील देशाची सर्वोत्तम कामगिरी आहे. आपल्या चमकदार कामगिरीने भारताने पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासात 50 पदकांचा टप्पाही पार केला. पॅरालिम्पिक पदक विजेते मंगळवारी मायदेशी परतल्यावर शेकडो चाहत्यांनी फुल, हार आणि मिठाई देऊन त्यांचे स्वागत केले.
हे ही वाचा -
वॉशरूमच्या पाण्यापासून बनवलं जेवण? जगभरात BCCIची नाचक्की, AGF vs NZ मॅच दुसऱ्या दिवशीही रद्द