Daryl Mitchell: इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले (Headingley) येथे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यातील पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या संघानंर 225 धावा करून पाच विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडचे स्टार फलंदाज डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) आणि टॉम ब्लंडेल यांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला सन्मानजनक स्थितीत आणलं. या सामन्यात न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेलने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवलाय. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 400 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो पहिला न्यूझीलंडचा फलंदाज ठरलाय. 


डॅरिल मिशेलपूर्वी न्यूझीलंडचा माजी फलंदाज बर्ट सटक्लिफनं 1949 मध्ये इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत 451 धावा केल्या होता. त्यानं सात डावात एक शतक आणि चार अर्धशतक ठोकले. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी डॅरिल मिशेल नाबाद 78 धावांवर माघारी परतला. सध्या डॅरिल मिशेलविरुद्ध कसोटी मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यानं या मालिकेतील पाच डावात 150.33 च्या सरासरीनं 423 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. 


लीड्स कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशीचा खेळ संपू पर्यंत न्यूझीलंडच्या संघानं 225 धावा केल्या होत्या. महत्वाचं म्हणजे, डॅरिल मिशेल आणि ब्लंडेल यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात 236 धावांची महत्वाची खेळी केली होती. या मालिकेत मिशेल आणि ब्लंडेल यांच्यात तिसऱ्यांदात शतकीय भागेदारी झालीय. 


हे देखील वाचा-