SL W vs IND W: डंबुलाच्या (Dambulla) रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Rangiri Dambulla International Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघानं (Sri Lanka Women Vs India Women) 34 धावांनी श्रीलंकेला पराभूत केलं. या विजयासह भारतीय महिला संघानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 नं आघाडी घेतलीय. या सामन्यात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा आणखी एका विक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यात भारताकडून दीप्ती शर्मानं 8 चेंडूत 17 धावांची तुफानी खेळी केली. यासह तिनं आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 धावांचा टप्पा गाठला आणि 50 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम केल्या. 

दीप्ती शर्मानं टी-20 कारकिर्दीत भारताकडून आतापर्यंत एकूण 59 सामने खेळले आहेत. ज्यात तिनं 515 धावा आणि 61 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी दीप्ती शर्मा पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरली आहे. दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना 25 जून रोजी खेळला जाणार आहे. तर, या मालिकेतील तिसरा आणि अखरेचा टी-20 सामना 27 जून रोजी खेळला जाईल. टी-20 मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. 

भारत- श्रीलंका टी-20 मालिकेतील वेळापत्रक-

सामना तारिख ठिकाण
पहिला टी-20 सामना 23 जून आरडीआयसीएस, डंबुला
दुसरा टी-20 सामना 25 जून आरडीआयसीएस, डंबुला
तिसरा टी-20 सामना 27 जून आरडीआयसीएस, डंबुला

भारत- श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 1 जुलै पीआयसीएस, पल्लेकेले
दुसरा एकदिवसीय सामना 4 जुलै पीआयसीएस, पल्लेकेले
तिसरा एकदिवसीय सामना 7 जुलै पीआयसीएस, पल्लेकेले

भारताचा टी-20 संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकिपर), एस मेघना, दीप्ति शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड़, सिमरन बहादुर, रिचा घोष (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, जेमिमा रोड्रिग्स, राधा यादव.

भारताचा एकदिवसीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिक भाटिया (विकेटकिपर), एस मेघना, दिप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादुर, रिचा घोष (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, तानिया भाटिया (विकेटकिपर), हरलीन देओल.

हे देखील वाचा-