ENG Vs NZ 2nd Test Match Day 1 Scorecard:  इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज येथे खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडनं 87 षटकांत 4 बाद 318 धावा केल्या. या सामन्यात डॅरिल मिशेलनं आपला चांगला फॉर्म कायम ठेवत नाबाद 81 धावांची खेळी केली. तर, टॉम ब्लंडेलही नाबाद 67 धावांवर क्रीजवर उभा आहे. 


डॅरिल मिशेल आणि  टॉम ब्लंडेलची संयमी खेळी
पहिल्या दिवसातील तिसऱ्या डावात डॅरिल मिशेल आणि टॉम ब्लंडेलनं संभाळून फलंदाजी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागेदारी केली. न्यूझीलंडच्या संघानं पहिल्या दिवसाच्या टी टाईमपर्यंत चार विकेट्स गमावून 195 धावा केल्या. त्यावेळी न्यूझीलंडचा संघ अडचणीत दिसत होता. परंतु, लॉर्ड्स कसोटी सामन्यात शतक ठोकणाऱ्या मिशेलनं पुन्हा डाव सावरून संघाला मजबूत परिस्थितीत आणलं. 


169 धावांवर न्यूझीलंडनं गमावले चार विकेट्स
लंच ब्रेकपर्यंत न्यूझीलंडची धावसंख्या 2 बाद 108 अशी होती. त्यानंतर हेन्री निकोल्स आणि डेव्हन कॉन्वेही माघारी परतले. निकोल्सला 16 धावांवर जॅक क्रॉलीनं स्लिपमध्ये जीवदान दिलं. परंतु,  इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. निकोल्सनं 30 धावा केल्या. 


नॉटिंगहॅम कसोटी सुरु होण्यापूर्वी न्यूझीलंडचा मोठा धक्का
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पराभव पत्कारावा लागल्यानंतर केन विल्यमसनच्या रुपात न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनदुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी याला दुजोरा दिला. केन विल्यमसनच्या जागी हमिश रदरफोर्डचा संघात समावेश करण्यात आलाय. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचं नेतृत्व करत आहे.


हे देखील वाचा-