Ashwin in Tamil Nadu Cricket Association : भारतीय संघाचा सध्याच्या घडीचा आघाडीचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन (R Ashwin) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind vs Sa) संघात नसला तरी तो इतर वरिष्ठ खेळाडूंसोबत इंग्लंडविरुद्धच्या एकमेव टेस्टमध्ये (India vs England Test) मैदानात उतरणार आहे. दरम्यान त्याआधी तो आता क्लब क्रिकेट खेळण्याकरता तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन अर्थात TNCA मध्ये खेळणार आहे. याबद्दल बोलताना त्याने या लीगमध्ये खेळून आगामी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी लाल चेंडूने क्रिकेट खेळण्याचा आणखी सराव होईल असं आश्विनने सांगितलं आहे. भारतीय टीम 15 जूनपासून इंग्लंडला रवाना होणार असून तिथे तो एडबस्टनमध्ये  लीसेस्टरशर विरुद्ध सराव सामना खेळणार आहे.


अश्विन टीएनसीएमध्ये (R Ashwin in TNCA) प्रथम श्रेणी सामन्यांत एमआरसी ए संघाकडून खेळणार आहे. आयपीएलमध्ये (IPL 2022) नुकताच राजस्थान रॉयल्स संघाकडून (Rajsthan Royals) खेळल्यानंतर आता आश्विन पुन्हा एकदा मैदानात उतरेल. याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘‘मी माझा खेळ एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत आहे. मी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये योगदान देण्याच्या प्रयत्नात आहे.’’ आश्विनने आतापर्यंत 442 विकेट्स घेतल्या असून सर्वाधिक विकेट्स घेणारा तो दुसरा भारतीय असून पहिल्या स्थानावर माजी क्रिकेटर अनिल कुंबळे 619  विकेट्ससह आहे.


आश्विनचं आयपीएलमधील प्रदर्शन


रवीचंद्रन अश्विनचा संघ राजस्थान रॉयल्स यंदा आयपीएलमध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. यावेळी आश्विनने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये योगदान दिलं. त्याने 17 सामन्यात 7.50 च्या इकोनॉमीने 12 विकेट्स घेतल्या.तसंच 141.48 च्या स्ट्राईक रेटने एका अर्धशतकाच्या मदतीने 191 धावाही केल्या. 


हे देखील वाचा-