Kapil Dev on Majha Katta : भारताचा 1983 चा विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांना इतिहासातील एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं. फिरकीपटू गोलंदाजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतात मिडीयम पेसर, वेगवान गोलंदाजीची क्रेझ आणण्यात कपिल देव यांचा मोठा हात होता. दरम्यान आताही भारतीय संघात काही क्लासिक वेगवान गोलंदाज असून भविष्यात वेगवान गोलंदाजी करु इच्छिनाऱ्यांसाठी कपिल यांनी एक खास सल्ला दिला आहे. 1983 च्या विजयावरील सिनेमा '83' नुकताच प्रदर्शित झाला. याच निमित्ताने या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आणि भारताचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांनी एबीपीच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात आपल्या आठवणी शेअर केल्या.
तर सध्या क्रिकेट जगतात अष्टपैलू खेळाडू असण्याचे अनेक फायदे आहेत. अष्टपैलू खेळाडूला संघाला दोन्ही प्रकारे मदत करता येण्यासोबत संघातील त्याचं स्थानही जवळपास पक्क असतं. सध्या भारताकडे हार्दीक पंड्या, शार्दूल ठाकूर असे काही अष्टपैलू खेळाडू असले तरी कपिल देव यांची सर अजूनतरी कोणालाच आली नाही. त्यात भारताकडे सुरुवातीपासून वेगवान गोलंदाजांची वानवा आहेच...त्यामुळे भविष्यात वेगवान गोलंदाज व्हायचं असल्यास काय सल्ला आहे असा प्रश्न कपिल यांना विचारताच त्यांनी ''आईच्या हातचं घरगुती जेवण खा!'' असा साधा सरळ सल्ला दिला. यामागे त्यांनी एक हेल्दी लाईफस्टाईलचं तुम्हाला वेगवान गोलंदाज बनवू शकते असं सांगायचा प्रयत्न करतना घरगुती जेवण सर्वात हेल्दी असल्याचं सांगितलं.
- Kapil Dev on Majha Katta : विंडीजची जल्लोषाची तयारी, ड्रेसिंग रुम शॅम्पेनने भरलेली, विजयानंतर कपिल देव थेट ड्रेसिंग रुममध्ये घुसून म्हणाले...
- Kapil Dev on Majha Katta : विश्वचषक जिंकल्यानंतरही दोन गोष्टींची खंत कायम मनात, माझा कट्ट्यावर कपिल यांनी शेअर केला अनुभव
- 1983 Players Match Fee: 1983चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना किती मानधन मिळायचं? एकदा बघाच