Kapil Dev on Majha Katta : 1983 च्या विश्वचषक विजयावरील सिनेमा '83' नुकताच प्रदर्शित झाला. ज्यानंतर 1983 च्या त्या ऐतिहासिक विजयाचा आनंद आणि आठवणी भारतभर पसरु लागल्या. याच निमित्ताने या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आणि भारताचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांनी एबीपीच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला. याचवेळी त्यांनी काही आठवणीतले किस्से शेअर केले. हे सारे किस्से कपिल देव यांच्यासोबतच्या माझा कट्टामध्ये तुम्ही पाहू शकता. हा कार्यक्रम शुक्रवारी अर्थात 31 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता... त्यातील एक हटके किस्सा म्हणजे विजयानंतर पराभूत संघ वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये कपिल देव पोहचत त्यांनी थेट तिथल्या शॅम्पेन बॉटल उचलल्याचा.. तर हा किस्सा नेमका काय आहे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
तर वेळ होती 1983 सालची. त्यावेळचा भारतीय संघ विश्वचषक जिंकणं म्हणजे साऱ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं. कारण अधिक सोय-सुविधा नसताना वेस्ट इंडिज या त्यावेळच्या सर्वात चॅम्पियन संघाला मात देऊन विश्वचषक जिंकण कोणत्याही संघाला अवघडचं होतं. पण त्याचवेळी संघात असणाऱ्या सर्व खेळाडूंनी जिवाचं रान केलंच, पण संघाचे कर्णधार कपिल देव यांनी सुरुवातीपासून अतिशय सकारात्मक विचारांसह अप्रतिम अष्टपैलू खेळ दाखवत सर्व सामने जिंकण्याच्याच दृष्टीने खेळले. ज्यामुळे अखेरचा सामना बलाढ्य वेस्ट विडिंजला 43 धावांनी मात देत भारताने जिंकला. त्यानंतर काय नुसता जल्लोष आणि आनंदमय वातावरणात भारतीय खेळाडू विजयाचं सेलिब्रेशन करत होते.
त्यावेळी मैदानावर पराभवानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हात मिळवण्याची प्रथा नसल्याने खेळाडू एकमेंकाच्या ड्रेसिंग रुममध्ये जात असतं. ज्यामुळे कर्णधार कपिल हेही वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले. त्यांनी तिथे पाहिले तर विंडीजनी सेलिब्रेशनसाठी बऱ्याच शॅम्पेनच्या बॉटल्स आणून ठेवल्या होत्या. त्यापाहून कपिल हे विंडीजचा कर्णधार क्लाइव्ह लॉयडसमोर 'आता तुम्हाला याची काय गरज?' असं मिश्किलपणे म्हणत, त्यांच्या शॅम्पेन बॉटल्स उचलून घेऊन आले. ज्यानंतर विंडीजने ठेवलेल्या शॅम्पेन बॉटल भारतीय खेळाडूंनी उडवत आनंद साजरा केला. कपिल यांनी सांगितलेल्या या किस्स्यातून तत्कालीन काळात सर्व खेळाडू आणि संघामध्ये किती खेळीमेळीचं वातावरण होतं, याचा प्रत्यय येतो.
- 83 Box Office Collection : '83' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई, चार दिवसांत कमावले 54.29 कोटी
- 1983 Players Match Fee: 1983चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना किती मानधन मिळायचं? एकदा बघाच
- Ranveer Singh 83 Movie Premiere : मोठ्या पडद्यावरील कपिल देव आणि खऱ्या आयुष्यातील कपिल देव आमने-सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha