Dwayne Bravo Dance On Srivalli Song: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa) या चित्रपटाला जगभरातून खूप प्रेम मिळत आहे. या चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्यांवर (Srivalli Song) लोक जोरदार रील्स बनवत आहेत.  एवढेच नव्हे तर, आता क्रिकेटपटूंनाही श्रीवल्ली गाण्यानं वेड लावलंय. रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja), डेव्हिड वार्नर (David Warner) यांच्यानंतर आता वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होचाही (Dwayne Bravo) व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान विरुद्ध संघाचा विकेट घेतल्यानंतर ब्रोव्हानं चक्क मैदानातच श्रीवल्ली गाण्यावरील सिग्नेचर स्टेप केल्या आहेत. या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे. 


बीपीएल लीगच्या एका सामन्यादरम्यान ड्वेन ब्रोव्हो गोलंदाजी करण्यासाठी आलेला असताना त्याच्या चेंडूवर विरुद्ध संघाचा फलंदाज झेलबाद होतो. त्यानंतर ड्वेन ब्रोव्हो मैदानातच श्रीवल्ली गाण्यावरील स्टेप्स करून आनंद व्यक्त करतो. ड्वेन ब्रोव्होचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली जात आहे. 


व्हिडिओ-



याआधी ड्वेन ब्राव्होनं श्रीवल्ली या गाण्यावर रील बनवताना अल्लू अर्जुनची नक्कल करण्याचा प्रयत्न केला होता. अल्लू अर्जुनची नक्कल करण्यात ड्वेन ब्राव्होही काही प्रमाणात यशस्वी ठरलाय. दरम्यान, डेव्हिड वॉर्नरनंही या चित्रपटातील गाण्याशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याच्या मुली त्यावर नाचताना दिसत आहेत. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha