India vs West Indies Series Squad: बीसीसीआयनं (BCCI) वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय (ODI) आणि टी-20 (T20) मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केलीय. येत्या 6 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तर, 16 फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेसाठी युवा खेळांडूना संधी देण्यात आलीय. तर, कर्णधार रोहीत शर्माचंही (Rohit Sharma) संघात पुनरागमन झालंय. परंतु, भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेत संघात स्थान मिळालं नाही. यामागचं कारणही बीसीसीआयनं स्पष्ट केलंय.


बीसीसीआयनं एका निवेदनात म्हटलं आहे की, " वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर, केएल राहुल फक्त दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध असेल. जडेजा गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र,तो या मालिकेला मुकणार आहे. जडेजासोबत धोका पत्करू इच्छित नाही. जडेजानं पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर संघात पुनरागमन करावं, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी त्याची गरज भासणार असल्याचंही बीसीसीआयनं म्हटलंय. 


जडेजाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2021 मध्ये खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ही त्याची शेवटची मालिका होती. त्यानं 2 डिसेंबर 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर, 8 नोव्हेंबर 2021 रोजी त्यानं टी-20 सामना खेळला होता. 


भारताचा एकदिवसीय आणि टी-20 संघ


एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल , कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.


टी-20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल , युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha