IPL 2022- S Sreesanth : वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने आयपीएलच्या आगामी लिलावासाठी नावनोंदणी केली आहे. त्यासाठी श्रीसंतची मूळ किंमत 50 लाख रुपये इतकी ठरवण्यात आली आहे. 2013 साली आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतर बीसीसीआयनं त्याची शिक्षा कमी करुन सात वर्ष केली. त्यानंतर 2020-21 या मोसमात मुश्ताक अली स्पर्धेतून श्रीशांतनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं.


केरळकडून खेळणाऱ्या श्रीसंतनं नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडकातही सहा डावात 13 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे दहा फ्रँचायझीपैकी श्रीसंतवर कोण बोली लावणार याची उत्सुकता आहे. श्रीसंतने आतापर्यंत 44 आयपीएल मॅच खेळल्या असून 44 विकेट घेतले. श्रीसंत राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, आणि आता बंद झालेल्या कोच्ची टस्कर्स केरळसाठी खेळला आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी खेळलेल्या विजय हजारे ट्रॉफीत श्रीशांतने 6 मॅचमध्ये 13 विकेट घेतल्या आहे. श्रीशांत 2008 साली  राजस्थान रॉयल्स या संघाचा सदस्य होता. 


या महास्पर्धेचा महालिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे पार पडणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी एएनआय वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली असून ANI ने ट्वीट करत ही माहिती सर्वांना दिली. इंडियन प्रीमिअर लीगच्या या पंधराव्या हंगामात दोन नव्या संघाचा समावेश झाला आहे. लखनौ आणि अहमदाबादचा लीगमध्ये समावेश झाल्यानं 8 च्या जागी 10 संघांमध्ये सामने रंगणार आहेत. दरम्यान या नव्या दोन संघाना प्रत्येकी तीन खेळाडू लिलावापूर्वी संघात सामिल करुन घेण्यासाठी दोन आठवड्याचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर लिलाव पार पडणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :