Team India Squad For Against West Indies Series : वेस्ट विंडिजविरोधात सहा फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी न करु शकणाऱ्या अश्विनला वगळण्यात आले आहे. युवा फिरकीपटू रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) याला टी20 आणि एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. तर अष्टपैलू दीपक हुड्डा (Deepak Hooda) याला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे.
कुलदीपचं पुनरागमन -
चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. बऱ्याच दिवसानंतर कुलदीपचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे 2019 नंतर आता पुन्हा एकदा कुलदीप-चहल म्हणजेच कुलच्याची जोडी मैदानावर दिसणार आहे.
यांनाही संधी -
रवि बिश्नोई याच्याशिवाय बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. दुखापतीनंतर अष्टपैलू वॉशिंगटन सुंदर याने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाज आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज यांनाही संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये खराब कामगिरी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला टी२० मध्ये संधी देण्यात आली आहे.
रोहित शर्माचं पुनरागमन -
दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेणाऱ्या रोहित शर्माचं भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली असून भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि टी२० संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. रोहित शर्माला बंगळुरु येथील एनसीएमध्ये आपली फिटनेस टेस्ट पास करावी लागली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त झालेला रोहित शर्मा एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करत होता. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत आहे. पण रोहित शर्माने आज एनसीएमध्ये आपली फिटनेस टेस्ट पास केली आहे.
बुमराह-शमीला आराम -
वर्कलोडमुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना वेस्ट विंडिजविरोधातील मालिकेत आराम देण्यात आला आहे. तर केएल. राहुल पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध नसेल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर भारतीय संघासोबत राहुल जोडला जाणार आहे. रविद्र जाडेजा दुखापतीमुळे वेस्ट विंडिजविरोधच्या मालिकेतून आराम देण्यात आला आहे. अक्षर पटेलने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे तो T20 मालिकेत खेळणार आहे.
एकदिवसी संघ ODI squad -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
T20I squad :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक
एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता