एक्स्प्लोर

BCCI ला तब्बल 119 कोटींचा दणका, Dream11 ला सरकारचा झटका, आशिया कपच्या तोंडावर स्पॉन्सर्स गेल्यानं BCCI ला फटका

भारत सरकारने ऑनलाइन गेमिंग कायदा लागू झाल्यानंतर पैशांच्या आधारावर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घातली.

Dream11 OUT Team India Sponsorship : भारत सरकारने ऑनलाइन गेमिंग कायदा लागू झाल्यानंतर पैशांच्या आधारावर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घातली. याचा थेट परिणाम फॅन्टसी गेमिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी ड्रीम11 (Dream11) वर झाला असून, कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कळवले आहे की ते आता भारतीय संघाचे स्पॉन्सर (Sponsor) राहू शकणार नाही. दुबईत सुरू होणाऱ्या आशिया कपच्या फक्त दोन आठवडे आधी टीम इंडियाला नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. ड्रीम11च्या माघारीमुळे बोर्डाला तब्बल 119 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

बीसीसीआयला दिली माहिती

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “ड्रीम11च्या प्रतिनिधींनी बीसीसीआय कार्यालयाला भेट दिली आणि सीईओ हेमांग अमीन यांना पुढे स्पॉन्सरशिप सुरू ठेवता येणार नसल्याची माहिती दिली. परिणामी, ते आशिया कपसाठी टीमचे स्पॉन्सर राहणार नाहीत. बीसीसीआय लवकरच नवीन टेंडर जारी करेल.”

ड्रीम11वर लागणार का दंड?

बीसीसीआयच्या दुसऱ्या अधिकाऱ्याच्या मते, ड्रीम11वर कोणताही दंड आकारला जाणार नाही. करारामध्येच एक तरतूद आहे की, जर स्पॉन्सरशिपचा मुख्य व्यवसाय सरकारच्या कायद्यामुळे प्रभावित झाला, तर त्यांना बीसीसीआयला कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.

तीन वर्षांचा 358 कोटींचा करार

ड्रीम11ची स्थापना सुमारे 18 वर्षांपूर्वी झाली. ब्लूमबर्गच्या मते, ही कंपनी सध्या तब्बल 8 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनासह भारतातील सर्वात मोठा फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. जुलै 2023 मध्ये ड्रीम11ने बीसीसीआयसोबत 3 वर्षांसाठी 358 कोटी रुपयांचा करार केला होता. याआधी हा अधिकार एडटेक कंपनी बायजूजकडे होता.

धोनीपासून रोहितपर्यंत ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

ड्रीम11चा आयपीएलमध्ये देखील मोलाचा वाट आहे. अनेक फ्रँचायझीसोबत त्यांचे करार आहेत. महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांसारखे टॉप क्रिकेटपटू या कंपनीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर राहिले आहेत. 2020 मध्ये चायनीज कंपनी विवो आयपीएलमधून बाहेर पडल्यावर ड्रीम11ने आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप स्वीकारली होती.
 
 फुटबॉल आणि बास्केटबॉलशीही नाते

ड्रीम11 केवळ क्रिकेटपुरते मर्यादित नाही, तर फुटबॉल आणि बास्केटबॉलशीही त्याचे नाते आहे. भारतातील सर्वोच्च फुटबॉल स्पर्धा असलेल्या इंडियन सुपर लीगचा तो अधिकृत फँटसी पार्टनर राहिला आहे, मात्र सध्या ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित आहे. 2017 साली एनबीए (National Basketball Association) ने ड्रीम11 प्लॅटफॉर्मवर आपला अधिकृत फँटसी गेम सुरू केला. त्याशिवाय प्रो कबड्डी लीग आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ यांच्यासोबतही या ऑनलाइन गेमिंग कंपनीने करार केले आहेत.

हे ही वाचा -

Prithvi Shaw : टायगर जिंदा है... मुंबईचा संघ सोडताच जुन्या फॉर्ममध्ये परतला पृथ्वी शॉ, टीकाकारांची तोडं बंद करणारी आणखी एक स्फोटक खेळी

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
Embed widget