एक्स्प्लोर

Dream 11 ने बीसीसीआयसोबतचा करार मोडला; आशिया चषकात टीम इंडियाच्या जर्सीवर नवीन नाव, महत्वाची अपडेट समोर

Dream 11 Team India: ऑनलाइन गेमिंग विधेयक आल्यानंतर 'ड्रीम 11' कंपनी चर्चेत आली आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर काही दिवसांतच ड्रीम 11 ने बीसीसीआयसोबतचा प्रायोजकत्व करार संपवला आहे.

Dream 11 Team India: संसदेत ऑनलाईन गेमिंगबाबत विधेयक (Online Gaming Bill 2025) मंजूर होताच अनेक गेम्सने रिअल-मनी गेम्स थांबवलेत. दरम्यान या विधेयकामुळे ड्रीम-11 (Dream 11), रमी, पोकरसारखे ऑनलाईन गेमही बंद झाले आहेत. पैशांचा समावेश असलेल्या ऑनलाईन गेमिंगमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होतंय. ऑनलाईन गेमिंगमुळे काहींनी आत्महत्या केल्याचंही केंद्र सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमिंग बंद करण्याबाबत विधेयक मांडण्यात आले. 

ऑनलाइन गेमिंग विधेयक आल्यानंतर 'ड्रीम 11' कंपनी चर्चेत आली आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर काही दिवसांतच ड्रीम 11 ने बीसीसीआयसोबतचा प्रायोजकत्व करार संपवला आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, ड्रीम 11 च्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांना स्पष्ट केले आहे की, ते हा करार पुढे चालू ठेवू शकणार नाहीत. ड्रीम 11 आणि बीसीसीआयचा 2023 रोजी करार सुरु झाला होता. हा करार 2026 पर्यंत करण्यात आला होता. परंतु आता ऑनलाईन गेमिंगबाबत विधेयकानंतर ड्रीम 11 ला मोठा फटका बसणार आहे.

आशिया चषकांत टीम इंडियाच्या जर्सीवर नवीन नाव- (New name on Team India's jersey in Asia Cup 2025)

ड्रीम इलेव्हनने टीम इंडियाचं प्रायोजकत्व थांबवल्यानं आगामी आशिया चषकांत टीम इंडियाच्या जर्सीवर नवीन नाव दिसेल. त्यामुळे बीसीसीआय लवकरच प्रायोजकासाठी नवीन निविदा जारी करू शकते. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवर आता कोणत्या प्रायोजकाचं नाव झळकणार हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. 

Dream 11 भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म म्हणून उदयास- (Dream 11 emerges as India's largest online gaming platform)

सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आलेली ड्रीम-11 गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्येही सक्रिय झाली होती आणि परिणामी 2023 मध्ये ड्रीम-11 ने बीसीसीआयसोबत 358 कोटी रुपयांचा करार केला. या करारामुळे ही कंपनी भारतीय क्रिकेट संघाची टायटल प्रायोजक बनली आणि तेव्हापासून टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम-11 चे नाव लिहिले गेले आहे. हा करार 3 वर्षांसाठी होता जो 2026 मध्ये संपणार आहे. पण त्याआधीही हे विधेयक मंजूर झाल्यामुळे ड्रीम इलेव्हनने टीम इंडियाचं प्रायोजकत्व काढलं आहे. 

टीम इंडियाचे आतापर्यंतचे प्रायोजक- (Team India Sponsors)

1. Sahara: 2001 ते 2013 पर्यंत प्रायोजक होते.
2. Star India: 2014 ते 2017 पर्यंत प्रायोजक होते.
3. Oppo: 2017 ते 2020 पर्यंत प्रायोजक होते.
4. Byju's: 2019 ते 2023 पर्यंत प्रायोजक होते.
5. Dream 11- 2023 पासून आजपर्यंत....

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Team India Without Sponsor : टीम इंडियाच्या जर्सीवरून Dream11 होणार गायब? आशिया कपमध्ये स्पॉन्सर शिवाय उतरायची का आली वेळ? जाणून घ्या

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget