Dinesh Karthik Retirement नवी दिल्ली: भारताचा स्टार क्रिकेटर दिनेश कार्तिकनं कसोटी, वनडे आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वाढदिवसाच्या दिवशी दिनेश कार्तिकनं निवृत्ती जाहीर केली आहे. दिनेश कार्तिकनं आयपीएलचं अखेरचं पर्व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळलं. आरसीबीचा एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला होता. त्यावेळी दिनेश कार्तिकच्या निवृत्तीचा अंदाज सर्वांना आला होता. आज दिनेश कार्तिकनं स्वत: हून याबाबत घोषणा केली आहे.  


कार्तिकने एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्टवर करत म्हटलं की,' गेल्या काही दिवसांमध्ये मला  जो स्नेह, पाठिंबा आणि प्रेम मिळालं त्यानं भारावून गेलो आहे. ज्या चाहत्यांनी हे सर्व घडवलं त्या सर्वांचं आभार आणि धन्यवाद असं दिनेश कार्तिकनं म्हटलं.


बराच वेळ विचार केल्यानंतर मी क्रिकेटपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. मी अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा केली आहे. माझ्या खेळाचे दिवस मागे ठेवत पुढे येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासा तयार राहण्याची माझी भूमिका आहे.  


दिनेश कार्तिकची पोस्ट :







दिनेश कार्तिकनं त्याचे सर्व कोच, कॅप्टन, निवड समितीचे सदस्य, संघातील सहकारी आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांचं, ज्यांनी  हा प्रवास आनंददायी बनवला त्यांचं आभार मानतो, असं म्हटलं. 


माझे पालक माझा आधार असून त्यांचा इतक्या वर्षांचा पाठिंबा आणि ताकद मिळाली. या सर्वांच्या सदिच्छांशिवाय मी काहीच  करु शकलो नसतो, असं दिनेश कार्तिकनं म्हटलं. याशिवाय स्पोर्टर्सपर्सन असलेल्या दीपिकानं माझ्यासाठी  तिचं करिअरं थांबवलं त्यासाठी तिचं आभार मानतो, असं कार्तिकनं म्हटलं.  क्रिकेटच्या सर्व चाहत्यांचे आणि प्रशंसकांचे आभार मानतो, असं  दिनेश कार्तिकनं म्हटलं.   


धोनी अगोदर पदार्पण


दिनेश कार्तिकनं आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनी अगोदर  पदार्पण केलं होतं.  कार्तिकनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत नोव्हेंबर 2004 मध्ये पदार्पण केलं होतं. तर, वनडे मध्ये इंग्लंड विरुद्ध 5 सप्टेंबरला 2004 रोजी पदार्पण केलं होतं. टी-20 क्रिकेटमध्ये 1  डिसेंबर 2006 ला त्यानं पदार्पण केलं होतं. तर, महेंद्रसिंह धोनीनं कसोटीमध्ये पदार्पण डिसेंबर 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध केलं होतं. एकदिवसीय सामन्यात धोनीनं डिसेंबर 2004 मध्ये पदार्पण केलं होतं. टी-20 क्रिकेटमध्ये धोनी आणि दिनेश कार्तिकनं एकाच मॅचमध्ये पदार्पण केलंहोतं.  


दिनेश कार्तिकनं भारताकडून 26 कसोटी मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 1025 धावा केल्या. तर, 57  कॅच आणि 6 जणांना स्टम्पिंग बाद केलं. दिनेश कर्तिकनं 94 वनडे सामन्यांमध्ये  भारताचं प्रतिनिधीत्व केलं. यामध्ये त्यानं 1752 धावा केल्या. तर, 60 टी20 मॅच त्यानं खेळल्या आहेत.  


संबंधित बातम्या :