IND vs BAN Warm Up Match न्यूयॉर्क: भारतीय टीम (Team India) टी 20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) च्या पूर्वतयारी निमित्त सराव सामना बांगलादेश (Bangaladesh)  विरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ केवळ एक सराव सामना खेळणार आहे. आयपीएल स्पर्धेत खेळत असल्यानं भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी कमी वेळ मिळाला होता. त्यामुळं बांगलादेश विरुद्धची मॅच भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या मॅचमधील कामगिरीच्या आधारावर टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपसाठी प्लेईंग इलेव्हन निश्चित करु शकते. आजच्या मॅचमध्ये जाणवणाऱ्या उणिवा भरुन काढणे आणि चुका दुरुस्त करण्याचं काम टीम इंडियाला करावं  लागेल. आजच्या मॅचच्या आधारेच भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. 


भारत आणि बांग्लादेश यांच्यात भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता मॅच सुरु होणार आहे. ही मॅच भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील मॅच न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानावरच भारत आणि पाकिस्तान, भारत विरुद्ध आयरलँड आणि भारत आणि अमेरिका यांच्यातील सामने पार पडणार आहेत. 


या खेळाडूंवर असेल नजर


टीम इंडियाकडून सराव सामन्यात उपकॅप्टन हार्दिक पांड्या कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याचा फॉर्म खराब राहिला होता. याशिवाय ऑलराऊंडर शिवम दुबे देखील आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात फ्लॉप ठरला होता. यामुळं शिवम दुबे कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारताच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर देखील सर्वांचं लक्ष असेल.  


5 जूनपासून भारताची टी-20 वर्ल्ड कप मोहीम सुरु होणार


भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपची सुरुवात 5 जूनपासून करणार आहे. भारतीय प्रमाणवेळेप्रमाणं टी-20 वर्ल्ड कप 2 जूनला सुरु होणार असला तरी प्रत्यक्षात तो 1 जूनला सुरु होणार आहे. भारताची पहिली मॅच 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार आहे. तर, 9 जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. 12 जूनला भारत विरुद्ध अमेरिका, 15 जूनला भारत विरुद्ध कॅनडा मॅच होणार आहे. 


टीम इंडियामध्ये कुणाला संधी?


रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह  


संबंधित बातम्या :



20 संघ, 300 खेळाडू, पण विराट आणि बाबर राहणार किंग, टी20 क्रिकेटचे दोन बादशाह