एक्स्प्लोर

Jasprit Bumrah News : आयपीएलमुळे जसप्रीत बुमराहची फिटनेस झाली खराब? माजी दिग्गजांचा BCCI अन् मुंबई इंडियन्सवर थेट आरोप

सध्या भारतीय क्रिकेट संघात वर्कलोड मॅनेजमेंटवर मोठी चर्चा सुरू आहे, आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह.

Dilip Vengsarkar on Jasprit Bumrah Workload : सध्या भारतीय क्रिकेट संघात वर्कलोड मॅनेजमेंटवर मोठी चर्चा सुरू आहे, आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटीच्या मालिकेत बुमराह फक्त तीन सामन्यांमध्येच खेळला. यामुळे त्याच्यावर टीकाही झाली. अनेक माजी क्रिकेटपटूंना वाटते की बुमराहने (Jasprit Bumrah) या दौऱ्यात सर्व सामने खेळायला हवे होते. आता माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही बुमराहच्या वर्कलोडबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

वेंगसरकर यांचे मत आहे की, वर्कलोडमुळे बुमराहला दोन सामने बाहेर बसवणे चुकीचा निर्णय होता. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर बीसीसीआयने बुमराहला आयपीएल 2025 खेळण्यापासून रोखले असते, तर वर्कलोड मॅनेजमेंटची गरजच पडली नसती. हा त्यांचा थेट आरोप आता सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे, कारण बुमराह आयपीएलमध्येही दुखापतीतून सावरत मैदानात उतरला होता.

बीसीसीआय जबाबदार

‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना वेंगसरकर म्हणाले, 'भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या दृष्टीने बीसीसीआय, निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटने त्याला आयपीएल 2025 मधून बाहेर राहण्यासाठी सांगायला हवे होते, पण तसे झाले नाही. तो पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नव्हता, तरीही आयपीएल खेळायला उतरला."

ते पुढे म्हणाले की, 'जर मी मुख्य निवडकर्ता असतो, तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि बुमराह दोघांनाही पटवून दिले असते की त्याने आयपीएल टाळावे. कारण इंग्लंड मालिकेसाठी त्याचे फिट राहणे अत्यंत गरजेचे होते. आयपीएलमध्ये केलेले धावा-गोलंदाजी कोण आठवून ठेवतो? पण या मालिकेत मोहम्मद सिराजची उत्कृष्ट गोलंदाजी, शुभमन गिल, के.एल. राहुल, यशस्वी जैसवाल, ऋषभ पंत यांची चमकदार फलंदाजी आणि वॉशिंग्टन सुंदरचे ऑलराउंड प्रदर्शन मात्र लोकांना नक्की आठवेल."

आशिया कप 2025 मध्ये जसप्रीत बुमराह खेळणार का?

यंदा आशिया कप 2025 युएईमध्ये होणार आहे आणि तेथील खेळपट्ट्या आणि सहा महिन्यांनंतर होणारा टी-20 वर्ल्ड कप पाहता, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह महत्त्वाचा खेळाडू असू शकतो. पण, सर्वात मोठी समस्या म्हणजे बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची उपलब्धता. वेगवेगळ्या फॉरमॅटमधील कामाचा ताण लक्षात घेता दोन्ही गोलंदाजांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करण्यात आले आहे आणि निवड बैठकीपूर्वी त्यांचे फिटनेस मूल्यांकन होण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा -

Team India Asia Cup 2025 : चार दावेदार, जागा दोन! आशिया कपमध्ये कोण करणार टीम इंडियासाठी ओपनिंग? BCCI अन् गौतम पुढे 'गंभीर' पेच

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar in Baramati: कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
IND Squad vs NZ ODI Series : टी-20 मधून हकालपट्टी, आता वनडे मालिकेतून स्टार खेळाडूला डच्चू?, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCI उचलणार कडक पाऊल
टी-20 मधून हकालपट्टी, आता वनडे मालिकेतून स्टार खेळाडूला डच्चू?, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCI उचलणार कडक पाऊल
Maharashtra Weather Update: उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live: तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar in Baramati: कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
IND Squad vs NZ ODI Series : टी-20 मधून हकालपट्टी, आता वनडे मालिकेतून स्टार खेळाडूला डच्चू?, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCI उचलणार कडक पाऊल
टी-20 मधून हकालपट्टी, आता वनडे मालिकेतून स्टार खेळाडूला डच्चू?, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCI उचलणार कडक पाऊल
Maharashtra Weather Update: उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live: तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
Embed widget