Dhruv Jurel Rohit Sharma: पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताच्या युवा संघाने झिम्बाब्वेविरुद्ध जबरदस्त मुसंडी मारली आणि सलग चार सामने जिंकत मालिकेवर 4-1 असा कब्जा केला. रविवारी झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला. शिवम दुबे सामनावीर तर वॉशिंग्टन सुंदर मालिकावीर ठरला.
कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात या संघाने दमदार कामगिरी केली. टीम इंडियाची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली तेव्हा शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आलं होतं. याचदरम्यान टीम इंडियाचा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलची पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ध्रुव जुरेलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने रोहित शर्माच्या गार्डनबाबतच्या विधानावरुन फिरकी घेतली आहे. जुरेलसोबत अभिषेक शर्मा, खलील अहमद, रवी बिश्नोई आणि आवेश खान देखील आहेत. हे सर्व खेळाडू विमानतळावर बसलेले दिसून येताय. या फोटोसह गार्डनमध्ये फिरण्यास मनाई होती, म्हणून आम्ही विमानतळावर फिरायला आलो, असं ध्रुव जुरेलने म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
अनेकांना रोहित शर्माच्या या विधानाबाबत संदर्भ माहिती नसले. खरंतर इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणमला झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान रोहित युवा खेळाडूंना ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे ओरडला होता. त्यावेळी कोणीही गार्डनमध्ये फिरल्यास, तुमचं खरं नाही, असं रोहित शर्मा म्हणाला होता. रोहितचं हे विधान स्टंप माईकमध्ये कैद झालं होतं. यानंतर या विधानाची खूप चर्चा रंगली होती.
रोहित-कोहली-जडेजाची निवृत्ती-
भारताला टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांच्या निर्णयानं चाहत्यांना धक्का बसला होता. रोहित शर्मा सध्या विदेश दौऱ्यावर आहे, या दौऱ्यामध्ये त्याला एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांमधून निवृत्तीबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. यासंदर्भात उत्तर देताना रोहित शर्मानं त्याचा पुढचा प्लॅन सांगितला आहे.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'