Rohit Sharma: गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या ब्रेकवर आहे. 17 वर्षांनंतर टीम इंडियाला टी-20 चं विश्वचषक जिंकून दिल्यानंतर रोहित शर्मा अमेरिकेच्या एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात रोहित उपस्थित राहिला. यावेळी एक मजेदार प्रकार घडल्याचे समोर आले. 


रोहित शर्मा मंचावर असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्टार्क...स्टार्क अशा घोषणा सुरु झाल्या. कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या चाहत्यांनी ही घोषणाबाजी सुरु केली.  विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने मिचेल स्टार्कला चांगलचं धुतलं होतं. त्यामुळे चाहत्यांकडून स्टार्कची खिल्ली उडवण्यात येत होती. यावेळी मित्रांनो, शांत बसा...असं रोहित शर्माने उपस्थितांना सांगितले. 


पाहा व्हिडीओ-






टी-20 वर्ल्डकप 2021 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर दिली होती. मात्र रोहित शर्माच्या कर्णधारपदात टीम इंडियाला अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. यात टी20 वर्ल्डकप 2022, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकपचा समावेश आहे. मात्र 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आणि दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.


मी अजून खूप क्रिकेट खेळू शकतो- रोहित शर्मा


रोहित शर्माला 14 जुलै म्हणजे काल डल्लास मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यातील निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. रोहित शर्मानं म्हटलं की तो खूप पुढचा विचार करत नाही. मात्र, फॅन्स त्याला खूप क्रिकेट खेळताना पाहू शकतात. रोहित शर्मा म्हणाला मी अजून खूप क्रिकेट खेळू शकतो. हिटमॅनच्या या उत्तरावर उपस्थित असलेल्या चाहत्यांनी टाळ्या वाजवल्या.


रोहित-कोहली-जडेजाची निवृत्ती-


भारताला टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांच्या निर्णयानं चाहत्यांना धक्का बसला होता. रोहित शर्मा सध्या विदेश दौऱ्यावर आहे, या दौऱ्यामध्ये त्याला एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांमधून निवृत्तीबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. यासंदर्भात उत्तर देताना रोहित शर्मानं त्याचा पुढचा प्लॅन सांगितला आहे.  


संबंधित बातमी:


शुभमन गिलला कर्णधारपद कसं दिलं?, त्याला अनुभवही नाहीय; टीम इंडियाच्या माजी खेळाडूचं परखड मत