एक्स्प्लोर

Dewald Brevis : बेबी एबीची कमाल! 57 चेंडूत ठोकल्या 162 धावा, दक्षिण आफ्रिका टी20 चॅलेंजमध्ये घातला धुमाकूळ

Baby AB Dewald Brevis : दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने दक्षिण आफ्रिका टी20 चॅलेंजमध्ये धुमाकूळ घालत 13 षटकार आणि 13 चौकार मारत 57 चेंडूत 162 धावा केल्या आहेत.

Baby AB Dewald Brevis in CSA T20 Challenge : दक्षिण आफ्रिका संघातील युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस (Dewald Brevis) याने तुफान फटकेबाजी करत टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्यांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या टी20 चॅलेंजमध्ये (CSA T20 Challenge) टायटन्स संघाकडून 13 षटकार आणि 13 चौकार मारत 57 चेंडूत 162 धावा केल्या आहेत. त्याने अवघ्या अवघ्या 35 चेंडूत शतक पूर्ण केलं असून यानंतर सर्व क्रिकेट जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. डेवाल्डला त्याच्या मैदानाच्या सर्वबाजूस फटकेबाजी करण्याच्या कलेमुळे एबी डिव्हीलियर्सच्या नावाने बेबी एबी म्हणूनही ओळखलं जातं. दरम्यान त्याच्या या कामगिरीचं कौतुक करत स्वत: एबी डिव्हिलियर्सनेही त्याच्याबद्दल ट्वीट केलं आहे. 

दक्षिण आफ्रिकेत सुरु CSA T20 चॅलेंजच्या 25 व्या सामन्यात टायटन्स संघाकडून खेळताना फलंदाज डेवाल्डच्या या तुफान खेळीने मैदान हादरलं. ब्रेव्हिसने विरोधी संघ नाइट्सच्या गोलंदाजांवर असा हल्ला चढवला की प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो झालं होतं. ब्रेव्हिसच्या या अप्रतिम खेळीच्या जोरावर टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 268 धावा केल्या. टी20 क्रिकेटमध्ये अशी धमाकेदार खेळी कधीकधीच पाहायला मिळते. डेवाल्डने आपल्या आजच्या खेळीमध्ये तब्बल 284.21 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. ब्रेव्हिसने यावेळी शतक केवळ 35 चेंडूंमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर त्याने एकूण 57 चेंडूत 13 षटकार आणि 13 चौकारांसह 162 धावा केल्या. 

डेवाल्ड याला यंदा आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने संघात घेतलं. त्याने अधिक सामने खेळले नाहीत पण काही सामन्यात चुणूक नक्कीच दाखवली. त्याला दक्षिण आफ्रिकेचा पुढचा एबी डिव्हिलियर्स म्हणून ओळखले जाते. सध्या त्याच्याकडे अधिक अनुभव नसल्याने तो विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघात नाही. पण लवकरच तो संघात आगमन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स संघातही तो आगामी आयपीएल 2023 मध्ये कमाल करेल अशी भारतीय फॅन्सना आशा आहे. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू

ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला

अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर

एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?

Embed widget