DC W vs MI W WPL 2025: 1 चेंडू अन् विजयासाठी 2 धावांची गरज; मुंबई अन् दिल्लीच्या सामन्यात शेवटच्या चेंडूत काय घडलं?, VIDEO
DC W vs MI W WPL 2025: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 164 धावा केल्या होत्या.

DC W vs MI W WPL 2025: महिला प्रीमियर लीग 2025 चा (Womens Premier League 2025) दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians Women vs Delhi Capitals Women) यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने शेवटचया चेंडूवर सामना जिंकला. निक्की प्रसादला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. शेफाली वर्मानेही संघासाठी 43 धावांची खेळी केली.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 164 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 8 विकेट्स गमावून सामना जिंकला. दिल्लीने 19 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा केल्या होत्या. यादरम्यान, राधा यादव 8 धावा काढून खेळत होती आणि निक्की प्रसाद 28 धावांवर खेळत होत्या. यानंतर दिल्लीला शेवटच्या षटकात म्हणजे 6 चेंडूत जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता होती.
विजयासाठी 6 चेंडूत 10 धावांची गरज, शेवटच्या षटकांत काय घडलं?
शेवटच्या षटकात दिल्लीला जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता होती. मुंबईने शेवटचा षटक सजना सजीवला दिला. दिल्लीच्या निक्की प्रसादने षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकर टोलावला. त्यानंतर आता दिल्लीला जिंकण्यासाठी 5 चेंडूत 6 धावांची आवश्यकता होती. दुसऱ्या चेंडूवर निक्कीने 2 धावा घेतल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. आता राधा यादव स्ट्राईकवर आली. चौथ्या चेंडूवर राधा यादवने एक धाव घेतली. पुन्हा निक्की प्रसाद स्ट्राईकवर आली. मात्र यावेळी षटकातील पाचव्या चेंडूवर निक्की प्रसाद बाद झाली. यानंतर दिल्लीची अरुंधती फलंदाजीसाठी मैदानात उतरली. अरुंधतीने शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेऊन संघाला विजय मिळवून दिला.
एका चेंडूत 2 धावांची गरज अन् दिल्लीने जिंकला सामना, VIDEO:
ARUNDHATI REDDY AFTER THE MATCH WINNING DIVE. 🙇♂️ pic.twitter.com/YRMjB6YSAc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 15, 2025
A LAST BALL THRILLER IN THE WPL. 🔥
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 15, 2025
- Delhi Capitals beat Mumbai Indians.pic.twitter.com/igOl1XVGxF
WPL च्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले-
सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे की एखाद्या संघाने शेवटच्या चेंडूवर फक्त 2 विकेट्सच्या फरकाने सामना जिंकला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा हा सर्वात जवळचा विजय होता. 2024 मध्ये मुंबई आणि दिल्ली यांच्यात एक सामना खेळला गेला. तो सामनाही शेवटच्या चेंडूवर संपला होता.
संबंधित बातमी:
16 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

