Dawid Malan Retirement England : इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या 37व्या वर्षी त्याने निवृत्त जाहीर (Dawid Malan Announced Retirement)केली आहे. मालन बराच काळ संघाबाहेर होता. 2023च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर त्याला अद्याप संघात स्थान मिळाले नव्हते. आणि मालनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नव्हती. पण ते संस्मरणीय होते. त्याने टी-20 मध्ये 1800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने वनडेमध्ये 1400 हून अधिक धावा केल्या आहेत.


इंग्लंडकडून मलानने 22 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत 1074 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने एक शतक आणि नऊ अर्धशतके झळकावली आहेत. मलानने 30 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 1450 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 6 शतके आणि 7 अर्धशतके केली आहेत. त्याने 62 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1892 धावा केल्या आहेत. मालनने या फॉरमॅटमध्ये 1 शतक आणि 16 अर्धशतकं झळकावली आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 13201 धावा केल्या आहेत.






डेव्हिड मलान इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे. तो 2021 मध्ये पंजाब किंग्जकडून एक सामना खेळला होता. या सामन्यात तो 26 धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळला नाही. मालनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तरीही तो देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळू शकतात.


मलानने जुलै 2017 मध्ये इंग्लंडकडून पदार्पण कसोटी खेळली होती. आणि शेवटची कसोटी जानेवारी 2022 मध्ये खेळली गेली होती. मे 2019 मध्ये त्याने डेब्यू वनडे सामना खेळला. तर शेवटचा एकदिवसीय सामना नोव्हेंबर 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला गेला होता. मलानने 2017 मध्येच टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तर शेवटचा सामना सप्टेंबर 2023 मध्ये खेळला.


हे ही वाचा -


Shreyas Iyer : अय्यरमध्ये अचानक घुसला सुनील नरेनचा आत्मा, व्हिडिओवर पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाला... हे काय?


महिला, दिव्यांग अन् कसोटी क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल; आयसीसीचे अध्यक्ष बनताच जय शाह यांनी सांगितला प्लॅन!


Zaheer Khan : ठरलं तर मग! आज गौतम गंभीरची जागा घेणार मुंबईचा पठ्ठ्या; फ्रँचायझी करणार घोषणा?