David Warner century : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील (AUS vs ENG) तिसरा एकदिवसीय सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने तब्बल 355 धावा ठोकल्या. त्यात ट्रेविस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या शानदार शतकांचा समावेश होता. विशेष म्हणजे जानेवारी 2020 मध्ये वॉर्नरनं अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं होतं, त्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर वॉर्नरनं शतक ठोकलं असून त्यान 102 चेंडूत 106 रन केले. विशेष म्हणजे या शतकानंतर त्याने आपल्या एका कृतीमुळे छोट्या फॅनलाही खुश केलं.


वॉर्नरनं शतक ठोकल्यानंतर काही वेळातच तो बाद झाला. ऑली स्टोन याने 106 रनवर त्याला बाद केलं असता पॅवेलियनमध्ये परतत असताना वॉर्नरला शुभेच्छा देण्यासाठी बऱ्याच फॅन्सची गर्दी दिसत होती. याच गर्दीतील एका लहानग्याला वॉर्नरनं थेट आपले ग्लोव्हस दिले, अचानकपणे इतकी मोठी गोष्ट घडल्यामुळे तो चाहताही कमालीचा आनंदी झाला होता. तो लगेचच ग्लोव्ह घेऊन त्याची फॅमिली बसलेल्या ठिकाणी पळाला. वॉर्नरनं शतक ठोकताना घातलेला ग्लोव्ह मिळाल्याने छोटा फॅन आनंदी आणि आश्चर्यचकीत झाल्याचं पाहायला मिळालं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर पोस्ट केला आहेत.


पाहा VIDEO -






या दौऱ्यातील हा शेवटचा सामना असून ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. आता तिसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा संघ उत्कृष्ट लयीत दिसला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 355 धावा ठोकल्या. त्यात ट्रॅविस हेड आणि डेव्हिड वॉर्नरच्या शानदार शतकाचा समावेश होता. यामध्ये ट्रॅविस हेडने 130 चेंडूत 152 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत एकूण 16 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरने 102 चेंडूत 106 धावा केल्या. या कालावधीत वॉर्नरने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय मिचेल मार्शनं 30 आणि स्टीव स्मिथनं 21 रन केल्याचं पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियाच्या ऑली स्टोननं सर्वाधिक 4 विकेट्स यावेळी घेतल्या


हे देखील वाचा-