IND vs NZ, 3rd T20 Live : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. 12 वाजता सुरु होणारा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे उशीराने सुरु होत असून नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारताने दुसऱ्या टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करत एक मोठी धावसंख्या उभारली होती. दुसरा सामना बे ओव्हल मैदानावर झाला असून आजचा सामना होणाऱ्या मॅकलिन पार्कची खेळपट्टीही बॅटिंग फ्रेंडली असल्याने एक मोठी धावसंख्या आजही उभारली जाऊ शकते. ज्यामुळे आज न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
कसा आहे भारतीय संघ?
आज भारतीय संघाचा विचार करता टीम इंडियाने केवळ एक बदल केला आहे. वॉशिंग्टन सुंदर याला विश्रांती देत गोलंदाज हर्षल पटेल याला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे संजू सॅमसन याला या अखेरच्या सामन्यातही संधी न दिल्यामुळे फॅन्स निराश झाले आहेत. तर नेमका भारतीय संघ तिसऱ्या टी20 साठी कसा आहे पाहूया...
टीम इंडिया - हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार
आजचा सामना निर्णायक
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी दमदार असा विजय मिळवला. ज्यानंतर आता तिसरा आणि मालिकेतील अखेरचा टी20 सामना आज खेळवला जात आहे. भारताने आजचा सामना जिंकल्यास मालिकाही भारत जिंकेल. तर न्यूझीलंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटणार आहे.
डीडी स्पोर्ट्सवर पाहता येणार सामना
आजच्या या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
हे देखील वाचा-