T20 World Cup 2024 Format : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा नुकतीच पार पडली. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंडने दुसऱ्यांदा स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. आता 2024 मध्ये या स्पर्धेची पुढील आवृत्ती अर्थात टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) खेळवला जाईल. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार असून आयसीसीनं (ICC) या स्पर्धेसाठी काही नियम बदलले आहेत. T20 विश्वचषक 2022 मधील टॉप-8 संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. तर उर्वरित संघांना पात्रता फेरीचे सामने खेळावे लागणार आहे.
टी20 विश्वचषक 2022 च्या टॉप-8 संघांव्यतिरिक्त अफगाणिस्तान आणि बांगलादेशला थेट प्रवेश मिळेल. त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि अमेरिका या विश्वचषकाचे आयोजन करत आहे. त्यामुळे अमेरिका आणि वेस्ट इंडिजलाही यजमान संघ म्हणून स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. 2024 च्या टी20 विश्वचषकासाठी एकूण 12 संघ निश्चित करण्यात आले असून स्पर्धेत एकूण 20 संघ असणार आहेत. या 20 संघांतील 12 संघ निश्चित झाले असले तरी पात्रता फेरीनंतर उर्वरीत 8 संघ निश्चित होणार आहेत.
कसं असेल टी20 विश्वचषक 2024 चं फॉरमॅट?
टी20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 20 संघ असतील. या 20 संघांची प्रत्येकी 5 च्या एकूण 4 गटात विभागणी केली जाईल. त्याचबरोबर चारही गटांतील टॉप-2 संघ सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरतील. अशाप्रकारे टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर-12 फेरी होणार नाही. त्यामुळं सुपर-12 फेरीऐवजी सुपर-8 फेरी होईल. T20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. या 55 सामन्यांपैकी सुमारे काही सामने अमेरिकेत, तर उर्वरित सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. ज्यानंतर आता आगामी विश्वचषकात भारताकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
टी20 विश्वचषक 2022 इंग्लंडचा
टी20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा (PAK vs ENG) 5 गडी राखून पराभव केला. ज्यामुळे इंग्लंडने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी 2010 साली इंग्लंडने हे विजेतेपद पटकावले होते.
हे देखील वाचा-