Joe Root: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लीड्सच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या मालिकेत इंग्लंड स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सकडं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा तडाखेबाज फलंदाज जो रुटनं सोशल मीडियाद्वारे एक फोटो पोस्ट केला. त्यानं शेअर केलेल्या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा करणाऱ्या जो रूटनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या चित्रात तो भिंतीला टेकून उभा आहे. त्याच्या जवळ एक पोस्टर आहे, ज्यावर लिहिले आहे – मला क्रिकेट आवडत नाही, माझं त्याच्यावर प्रेम आहे. जो रूटचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत.
जो रुटचं ट्वीट-
न्यूझीलंडविरुद्ध जो रूटची दमदार फलंदाजी
जो रूट सध्या न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत शानदार फलंदाजी करत आहे. या मालिकेतील दोन सामन्यांमध्ये त्यानं सलग दोन शतके झळकावली. लॉर्ड्सवरील मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात त्यानं नाबाद 115 आणि नाबाद 11 धावांची खेळी केली. त्याचवेळी नॉटिंगहॅममधील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 176 धावांची खेळी केली.
कसोटीत 10 हजारांचा टप्पा गाठणारा दुसरा इंग्लंडचा खेळाडू
न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जो रूटनं कसोटी कारकिर्दीतील 10 हजार धावांचा टप्पा गाठला होता. जो रूट आगामी काळात महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडू शकतो, असा अनेक दिग्गजांचा विश्वास आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 200 कसोटी सामन्यांमध्ये 15 हजार 921 धावा आहेत. जो रूट अवघ्या 31 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत हा इंग्लिश फलंदाज सचिन तेंडुलकरचा कसोटी धावांचा विक्रम मोडू शकतो, असं मानलं जात आहे. आता येत्या काळात जो रूटचा फॉर्म कसा असेल? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
हे देखील वाचा-