Deepti Sharma India Women vs Australia Women Final CWG 2022: कॉमनवेल्थ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाकडून 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. ज्यामुळं सुवर्णपदकासाठी दावेदार मानले जाणाऱ्या भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानवं लागलंय. मात्र, या सामन्यात भारताची खेळाडू दीप्ती शर्मानं (Deepti Sharma) ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीचा (Beth Mooney) अप्रतिम झेल पकडला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर अनेकजण कमेंटही करताना दिसत आहेत.


व्हिडिओ- 



दिप्ती शर्माचा अप्रतिम झेल
ऑस्ट्रेलियाच्या डावात दिप्ती शर्मानं डीप मिड- ऑनवर उत्कृष्ट झेल पकडून सर्वांना आश्चर्यचकीत केलंय. ऑस्ट्रेलियाच्या डावातील अठराव्या षटकातील दुसऱ्या चेंडूत मूनीनं डीप मिड-ऑनच्या दिशेनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करा. मात्र, त्याठिकाणी फिल्डिंग करत असलेल्या दिप्ती शर्मानं अप्रतिम झेल पकडला. 


बेथ मूनीची दमदार खेळी
भारताविरुद्ध अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. ज्यात आठ चौकारांचा समावेश आहे. तर, दिप्ती शर्मानं भारताकडून गोलंदाजी करताना चार षटकात 39 धावा खर्च करून एक विकेट घेतली. तसेच फलंदाजीत 8 चेंडूत 13 धावांचं  योगदान दिलं.


हरमनप्रीत कौरची एकाकी झुंज
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 162 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची सुरुवात खराब झाली. भारतानं  2.4 षटकात 22 धावांवर स्मृती मानधना आणि शेफाली वर्माच्या रुपात दोन विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिना रॉड्रिगुएजनं भारताचा स्कोर 118 धावांवर पोहचवला. परंतु, मेगन शूटच्या गोलंदाजीवर जेमिमा बाद झाली. 


ऑस्ट्रेलियाचं जोरदार कमबॅक
त्यानंतर सलग विकेट्स गमावणं सुरुच ठेवलं. दबावाखाली अनावश्यक शॉट खेळून हरमनप्रीत कौरही बाद झाली. या सामन्यात भारतीय महिला संघानं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं. परंतु शेवटच्या षटकात फलंदाजांनी निशाजनक कामगिरी केली. या सामन्यात भारतीय संघ दबावाखाली खेळताना दिसला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्यात पिछाडीवर असूनही शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी झुंज दिली. याचं यशही त्यांना मिळालं. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं सुवर्णपदकावर नाव कोरलंय.


हे देखील वाचा-