Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात ऑस्ट्रेलियाचं (Australia) दबदबा पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसांपर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 66 सुवर्णपदकासह  एकूण 174 पदकं जिंकली आहेत. तर, 55 सुवर्णपदक आणि एकूण 166 पदकांसह यजमान इंग्लंडचा संघ पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत कॅनडाच्या ऍथलेटिक्सनंही दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. कॅनाडाच्या खात्यात आतापर्यंत 26 सुवर्णपदकासह एकूण 91 पदकं जमा झाली आहेत. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनीही चांगलं प्रदर्शन करून दाखवत 15 पदकं जिंकली.


कॉमनवेल्थ स्पर्धेच्या दहाव्या दिवशीही पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 66 सुवर्णपदकासह एकूण 174 पदकं जिंकली आहेत. तर, 55 सुवर्णपदकासह एकूण 166 पदक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पदकतालिकेत कॅनाडा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.  कॅनाडाच्या खात्यात आतापर्यंत 26 सुवर्णपदकासह एकूण 91 पदकं आहेत. याशिवाय, चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड (19 सुवर्ण, एकूण 48 पदक), पाचव्या क्रमांकावर भारत (18 सुवर्ण, एकूण 55 पदक), सहाव्या क्रमांकावर स्कॉटलँड (12 सुवर्ण, एकूण 49 पदक), सातव्या क्रमांकावर नायजेरिया (12 सुवर्ण, एकूण 49 पदक), आठव्या क्रमांकावर वेल्स (8 सुवर्ण, एकूण 27 पदक), नवव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (7 सुवर्ण, एकूण 27 पदक) आणि दहाव्या क्रमांकावर उत्तर आयर्लंड (7 सुवर्ण, एकूण 18 पदक).


कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 पदकतालिका- 




भारताच्या खात्यात आणखी सुवर्णपदक जमा होण्याची शक्यता
बर्मिंगहॅम स्पर्धेचा आज अकरावा आणि शेवटचा दिवस आहे. आज एकूण 12 सुवर्णपदकं पणाला लागली आहेत. आजच्या दिवशी भारताला आपल्या खात्यात आणखी पाच सुवर्णपदक जमा करण्याची संधी आहे. टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकीमध्ये भारतीय खेळाडू आज आपली ताकद दाखवतील.


हे देखील वाचा-