England Cricketer James Vince Home Attacked: इंग्लंडचा क्रिकेटर जेम्स व्हिन्सच्या (James Vince) घरावर दोनवेळा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. जेम्स व्हिन्स, त्याची पत्नी आणि दोन मुले हॅम्पशायर क्रिकेट क्लबच्या मुख्यालयाजवळील एका गावात राहतात. 15 एप्रिल आणि 11 मे रोजी सकाळी त्यांच्या घरावर हल्ला झाला. दोन्ही वेळा दोन वाहनांचे नुकसान झाले आणि खिडक्यांच्या काचा फोडल्या. तसेच घरावरही दगडफेक केली. हल्लेखोरांनी त्याला दुसरे कोणीतरी समजून ही घटना घडवून आणल्याचा दावा जेम्स व्हिन्सने केला आहे. 


जेम्स व्हिन्स आणि त्याची पत्नी एमी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. बँक स्टेटमेंट आणि फोन रेकॉर्ड तपासले असता, अशी घटना घडू शकते अशी कोणतेही शक्यता नव्हती. त्यामुळे  म्पशायर क्लब, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि व्यावसायिक क्रिकेट असोसिएशनने एकत्रितपणे एक तपास एजन्सी नियुक्त केली आहे, जेणेकरून या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचता येईल. मात्र या प्रयत्नानंतरही अजूनपर्यंत पुरावे मिळू शकले नाहीत.


सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?


एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये हल्लेखोराची ओळख पटलेली नाही, परंतु व्हिडीओ पाहता त्याने राखाडी रंगाची हुडी आणि काळी पँट घातली असल्याचे समोर आले आहे. त्याचा चेहरा झाकलेला होता आणि हुडीच्या मागे इंग्रजीत 'जिम किंग' असे शब्द लिहिलेले होते. घराच्या दुरुस्तीसाठी सुमारे एक महिना लागला आणि या काळात जेम्सचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी राहत होते. ते परत आल्यावर पुन्हा घटनेची पुनरावृत्ती झाली.






कोण आहे जेम्स विन्स?


जेम्स विन्स हा 2009 पासून हॅम्पशायर क्रिकेट क्लबकडून खेळत आहे आणि त्याने 2015 मध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत इंग्लंडकडून 13 कसोटी सामन्यांमध्ये 548 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 25 एकदिवसीय आणि 17 टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 616 आणि 463 धावा केल्या आहेत.


संबंधित बातम्या:


अंबानींच्या लग्नात हार्दिक पांड्याची हवा...; अभिनेत्री अनन्यासोबत थिरकला, सर्वांत जास्त चर्चेत असणारा Video


हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'