मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने जगभरातील बेस्ट कर्णधार जसं, स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग, सौरव गांगुली, ग्रीम स्मिथ, स्टीफन फ्लेमिंग आणि एमएस धोनी यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ कर्णधारांसोबत सामने खेळले आहेत. अशातच यांच्यापैकी फक्त एकच सर्वोत्कृष्ठ कर्णधार निवडणं फार अवघड असतानाही एक नाव त्याने निवडलं आहे. रावलपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शोएब अख्तरने भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचं नाव घेतलं आहे.


शोएब अख्तरने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतर कर्णधारांची तुलना नाही केली. परंतु, त्यांनी गांगुली यांना सर्वश्रेष्ठ भारतीय कर्णधाराचा दर्जा दिला आहे. एमएस धोनी एक उत्तम लीडर असल्याचंही शोएब अख्तरने यावेळी सांगितलं. तसेच गांगुलीमध्ये टीम तयार करण्याची कला असल्याचंही त्याने सांगितलं आहे.


हॅलो अॅपमधील एका इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या शोएब एख्तर म्हणाला की, जर भारताबाबत बोलायचे झाले तर सौरव गांगुली उत्तम कर्णधार आहे. त्यानंतर भारताला त्यांच्यासारखा उत्तम कर्णधार मिळाला नाही. धोनीसुद्धा उत्तम खेळाडू आणि कर्णधार आहे. परंतु, जेव्हा तुम्ही टीम तयार करता, त्यावेळी गांगुलीने उत्तम कामगिरी केली होती.'


शोएब अख्तरने आतापर्यंत 46 कसोटी सामने, 163 एकदिवसीय आणि 15 टी20 मध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, त्याने कधी विचारही केला नव्हता की, भारत विश्वचषक वगळता इतर कोणत्याही सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव करू शकेल. तो म्हणाला की, 'मी कधीच विचार केला नव्हता की, भारत विश्वचषक वगळता इतर सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव करू शकेल. मी 1999मध्ये भारताचा दौरा केला, आम्ही चेन्नईमध्ये जिंकलो, त्यानंतर दिल्लीमध्ये हरलो, पण आम्ही पुन्हा कोलकत्तामध्ये जिंकलो. आम्ही एकदिवसीय सामने जिंकले.'


परंतु, माजी गोलंदाज, जो आपल्या कारकीर्दीत जगभरातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यांने सांगितलं की, 'क्रिकेट विश्वाचं आणि भारतीय संघाचं रूपडं पालटलं जेव्हा गांगुली कर्णधार पदावर आले.' पुढे बोलताना तो म्हणाला की, 'जेव्हा भारतीय संघ गांगुलीच्या नेतृत्तावमध्ये 2004मध्ये पाकिस्तानमध्ये आला होता, तर मला वाटलं की, हा संघ पाकिस्तानला हरवू शकतो आणि तसंच झालं.' भारताने कसोटी सामन्यात पाकिस्तानला हरवून 2-1 आणि 2004मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 3-2 ने हरवलं.


महत्त्वाच्या बातम्या :


धर्माच्या आधारावर सोसायटीमध्ये घर नाकारणं देखील वर्णभेद : इरफान पठाण


सचिन तेंडुलकरला बाद केल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या; 'या' गोलंदाजाचा धक्कादायक खुलासा


न्यूड फोटो शेअर करुन हसीन जहांने केलेल्या आरोपांवर मोहम्मद शमीचं उत्तर...

हार्दिक पंड्या बाबा होणार! लॉकडाऊनमध्ये चाहत्यांना दिली गुड न्यूज


लॉकडाऊनमुळे मिळालेला सक्तीचा ब्रेक क्रिकेट खेळाडूंचं करिअर वाढवू शकतो : पीटरसन