Rohit Shrama Team India: भारतीय संघाला 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटीनंतर तीन सामन्यांची टी-20 मालिकाही होणार आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा जोरदार सराव करताना दिसत आहे. कसोटी मालिकेत अजून बराच वेळ शिल्लक असला तरी रोहित शर्मा कोणतीही कसर सोडत नाहीय. रोहित शर्माचा गार्डनमध्ये सराव करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो टीम भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत दिसत आहे.


व्हिडीओमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत सराव केल्यानंतर घरी परतताना दिसत आहे. रोहित शर्मा 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये भाग घेणार नाही, त्यामुळे त्याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सराव सुरू केला आहे. रोहित शर्माने मार्च 2024 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता, जो इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतरचा शेवटचा सामना होता. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आता कसोटी क्रिकेटसाठी स्वत:ला तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.


रोहित शर्माचा संपूर्ण व्हिडीओ-










बांगलादेशनंतर न्यूझीलंडविरुद्ध रंगणार मालिका-


बांगलादेशनंतर भारतीय संघ मायदेशी न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी या सर्व कसोटी मालिका खूप महत्त्वाच्या असतील. भारतीय संघापुढे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय असणार आहे. 


गुणतालिकेत अव्वल-


गेल्या दोन मोसमात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या भारतीय संघाला सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. सध्या टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2023-25 ​​गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 6 जिंकले आहेत, 2 गमावले आहेत आणि 1 अनिर्णित राहिला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया अनुक्रमे 68.5 आणि 62.5 गुणांसह अव्वल दोनमध्ये कायम आहेत. भारतीय संघाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत होणार आहे. तर, दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रतिष्ठेच्या पाच सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जाईल.


संबंधित बातमी:


WTC 2023–25 Points Table: पाकिस्तानचे भंगले स्वप्न, WTCच्या शर्यतीतून बाहेर; भारत आहे तरी कुठे? जाणून घ्या नवीन रँकिंग