ICC T20I Player of Year: दोन भागांमध्ये झालेली आयपीएल (IPL 2021) तसंच आयसीसीटी टी20 विश्वचषक, बिग बॅश लीग अशा विविध टी20 स्पर्धांमुळे यंदाच्या वर्षी भरपूर टी20 क्रिकेट खेळलं गेलं. ज्यामुळे अनेक नवनवीन रेकॉर्ड तसंच अप्रतिम खेळाचे दर्शन अनेक खेळाडूंनी घडवले. याच्याच जोरावर यंदाची आयसीसी टी20 प्लेयर ऑफ इयर (ICC T20 Player Of Year) साठीची नामांकनं समोर आली आहेत. यामध्ये एकही भारतीय खेळाडू नसल्याने भारतीय चाहते मात्र निराश झाले आहेत.


या यादीमध्ये दोन यष्टीरक्षक फलंदाजांसह दोन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. ज्यात इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघाचा प्रत्येकी एक एक खेळाडू आहे. दरम्यान भारताचा एकही खेळाडू या यादीत नाही. कारण भारताकडून यंदाच्या टी20 विश्वचषकात खास कामगिरी झाली नसून आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही भारत अधिक खेळला नाही.


ही आहेत 4 नावं


या यादीमध्ये इंग्लंडचा जोस बटलर, पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान, श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श यांचा समावेश आहे. यामध्ये बटलरने वर्षभरात इंग्लंडकडून अनेक सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. तर वानिंदूने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही बाजूने श्रीलंका संघासाठी कमाल केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या रिझवानने अनेक टी20 रेकॉर्ड नावे केले असून ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकवण्यात मिचेल मार्शने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे या चौघांची नावं पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आली आहेत.



हे देखील वाचा-  



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha