Ind vs SA, 2nd Innings Highlights : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs Sout Africa) यांच्यात सेंच्युरियन मैदानात (Centurion) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व मिळवलं आहे. दुसऱ्या डावात सुमार फलंदाजी करुनही भारताने पहिल्या डावातील मोठ्या धावसंख्येमुळे 305 धावांच आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं आहे. भारताने दुसऱ्या डावात 174 धावा केल्या असून आता भारतीय संघ गोलंदाजी करत आहे.



सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत राहुलचं शतक, अगरवालचं अर्धशतकाच्या जोरावर 327 धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी दबदबा कायम ठेवला. 197 धावांवर भारताने आफ्रिकेला सर्वबाद करत सामन्यावरील पकड मजबूत केली. ज्यानंतर 130 धावांची आघाडी घेऊन भारताने दुसऱ्या डावाची फलंदाजी सुरु केली. पण भारताचा एकही फलंदाज खास कामगिरी करु शकला नाही. केएल राहुलने सुरुवातीला टिकून खेळण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजूने विकेट जात असल्याने राहुलही 23 धावा करुन बाद झाल. मग पुजारा आणि कोहली खेळ सांभाळत आहेत, असे वाटत होते. पण तेव्हाच आधी पुजारा 16 आणि मग कोहली 18 धावा करुन तंबूत परतले. रहाणेही 20 धावाच करु शकला. ज्यानंतर ऋषभ पंतने अखेरच्या काही षटकात 34 धडाकेबाज धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने 174 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांची आवश्यकता आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha