ICC Awards 2021: भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root), न्यूझीलंडचा अष्टपैलू कायल जेमिसन (Kylie Jamieson) आणि श्रीलंकेचा कसोटी कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) यांची आयसीसी पुरुष कसोटी खेळाडू 2021 च्या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलंय. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या अश्विननं पुन्हा एकदा सर्वोकृष्ट फिरकीपटू म्हणून स्वत:ची छाप सोडलीय. त्यानं केवळ गोलंदाजीनं नव्हेतर फलंदाजीनीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
आयसीसीचं ट्वीट-
आर अश्विनआर अश्विननं या वर्षी आतापर्यंत आठ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 16.23 च्या सरासरीनं 52 विकेट्स घेतले आहेत. यावर्षी अश्विनं केवळ गोलंदाजीनंच नव्हे तर फलंदाजीनंही चांगली कामगिरी बजावलीय. त्यानं यावर्षी 28.08 च्या सरासरीनं 337 धावा केल्या आहेत.
जो रूट2021 मध्ये 15 सामन्यांत सहा शतकांसह 1,708 धावा करणारा इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट याचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यानं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर एका कॅलेंडर वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये 1 हजार 700 धावांचा टप्पा गाठलाय. अशी कामगिरी करणार तो तिसरा कसोटी फलंदाज ठरलाय. या यादीत मोहम्मद युसूफ दुसऱ्या आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स अव्वल स्थानी आहे.
कायल जेमिसनन्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कायल जेमिसननं यावर्षी पाच सामन्यात 17.51 च्या सरासरीनं 27 विकेट्स पटकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. एवढेच नव्हेतर यावर्षी सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रमही त्यानं आपल्या नावावर नोंदवून घेतलाय.
दिमुथ करुणारत्नेश्रीलंकेचा कसोटी कर्णधार दिमुथ करुणारत्ने यालाही आयसीसी पुरुष कसोटीपटू पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. त्यानं यावर्षी सात सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 69.38 च्या सरासरीनं 904 धावा केल्या आहेत. यात 4 शतकांचा समावेश आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-