Warwickshire County Cricket Club : दिग्गज क्रिकेटर ब्रायन चार्ल्स लारा (Brain Lara) याला क्रिकेटच्या खेळातील एक महान फलंदाज म्हणून ओळखलं जात. क्रिकेटच्या मैदानात त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी म्हणजे 6 जून रोजी त्याने एक खास रेकॉर्ड नावावर केला होता. 6 जून, 1994 साली लाराने केलेला हा रेकॉर्ड (brian lara record) आजदेखील तुटलेला नाही. 


नाबाद 501 धावा


टेस्ट क्रिकेटच्या (Test Cricket) प्रथम श्रेणी सामन्यात वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या ब्रायन लाराने (Brain Lara) केली असून ती म्हणजे काउंटी क्रिकेटमध्ये त्याने नाबाद 501 (Brain Lara Not Out 501) धावा ठोकल्या होत्या. इंग्लंडच्या बर्मिंघम मैदानात लाराने इंग्लिश काउंटी टीम वॉरविकशायरकडून (Warwickshire County Cricket Club) खेळताना या नाबाद 501 धावा केल्या होत्या. त्याने डरहम (Durham County Cricket Club) संघाविरुद्ध ही कामगिरी केली होती.


'या' दिग्गजांना टाकलं मागे


या खेळीच्या जोरावर लाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या ग्रीम हिक (405 रन नाबाद), आर्ची मॅक्लारेन (424 रन), आफताब बलोच (428 रन), बिल पोंसफोर्ड (429 रन), बिल पोंसफोर्ड (437 रन), बीबी निंबाळकर (443 रन नाबाद), सर डॉन ब्रेडमन (452 रन नाबाद) आणि हनीफ मोहम्मद (499 रन) या दिग्गजांना मागे टाकलं.


हे देखील वाचा-