U19 Women's World Cup qualifier: मलेशियामध्ये नेपाळ आणि यूएई (Nepal vs UAE)  यांच्यात महिला T20 अंडर-19 क्रिकेट विश्वचषकातील क्लालिफायर सामना खेळण्यात आला. या सामन्यात नेपाळचा संघ अवघ्या 8 धावांत आटोपला. तर, यूएईच्या संघानं अवघ्या सात चेंडूत हा सामना जिंकला. सामना खेळला गेला. या सामन्यात नेपाळचा संघ अवघ्या 8 धावांत आटोपला. यूएईच्या संघानं अवघ्या सात चेंडूत सामना जिंकला. यूएईकडून वेगवान गोलंदाज माहिका गौरनं पाच विकेट्स घेतल्या. या सामन्यात तिनं दोन निर्धाव षटक टाकून फक्त दोन धावा दिल्या. 


नेपाळचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फसला
नेपाळच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातील दुसऱ्याच षटकात नेपाळच्या सघानं पहिली विकेट गमावली. यानंतर तिसऱ्या षटकात तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दरम्यान, दोन धावांवर नेपाळच्या संघानं चार विकेट्स गमवल्या. त्यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या षटकात प्रत्येकी ए-एक विकेट पडली. सातव्या षटकात दोन विकेट पडल्या. आणि नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शेवटची विकेट पडली. या सामन्यात नेपाळच्या संघातील सहा खेळाडूंना खातेही उघडता आलं नाही. 20 षटकांच्या सामन्यात संपूर्ण संघ 8.1 षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. 


सात चेंडूत यूएईनं सामना जिंकला
नेपाळच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उरतलेल्या यूईएच्या संघानं फक्त सात चेंडूत हा सामना जिंकला. नेपाळच्या गोलंदाजांनी या सात चेंडूंमध्ये एक नो बॉल आणि एक वाईड टाकला. त्यामुळं यूएईलाही दोन अतिरिक्त धावा मिळाल्या. यूएईचा कर्णधार तीर्थ सतीशनं सर्वाधिक 4 धावा केल्या. सामना अवघ्या एका तासात आणि एकूण नऊ षटके आणि दोन चेंडूत संपला. दोन्ही संघाकडून एकाही फलंदाजाला दोन अंकी आकडा गाठता आला नाही.


या स्पर्धेत पाच संघ सहभागी
मलेशियामध्ये सध्या महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक क्वालिफायर सामने खेळले जात आहेत. प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत पाच संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये यूएई आणि नेपाळ व्यतिरिक्त थायलंड, भूतान आणि कतारचा संघही या स्पर्धेत सहभागी झाला आहे. या क्लालिफायर स्पर्धेतील पाच देशांचा विजेता संघ पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पहिल्या आसीसी अंडर-19 टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेत भाग घेईल.


हे देखील वाचा-