Umran Malik : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील दमदार गोलंदाजीच्या जोरावर उमरान मलिकला (Umran Malik) भारतीय संघात स्थान मिळालं आहे. त्याच्या या सिलेक्शननंतर संपूर्ण क्रिकेट जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ब्रेट लीने (Brett Lee) उमरानची तुलना पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वकार यूनुसशी (Waqar Younis) देखील केली होती. ज्यावर आता उमरानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.


इंडियन एक्सप्रेसशी बोलताना उमरान म्हणाला,'मी वकार यूनुसला फॉलो नाही करत माझे आदर्श बुमराह, शमी आणि भुवनेश्वर हे आहेत. मी इथवर पोहोचण्यासाठी या तिघांना फॉलो केलं आहे. आता मी देशासाठी अगदी दमदार प्रदर्शन करु इच्छितो. माझं स्वप्न आहे, या पाच सामन्यांमध्ये मी माझ्या कामगिरीने भारताला विजय मिळवून देऊ इच्छितो.' 


उमरानची आयपीएल 2022 मधील कामगिरी 


आयपीएल 2022 मध्ये उमरानने त्याच्या तुफान वेगाने सर्वांनाच आश्चर्यचकीत करुन सोडलं. त्याने गुजरातविरुद्ध एका सामन्यात तब्बल 5 गडी बाद करत विशेष कामगिरी केली. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सामना गमावलेल्या हैदराबाद संघाच्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला. यावेळी उमरानने 4 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 25 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. हंगामातील 14 सामन्यात उमरानने 21 विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीतही चांगली कामगिरी केली. याशिवाय आयपीएल 2022 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम गुजरात टायटन्सचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या नावावर होता. त्यानं चेन्नईविरुद्ध सामन्यात 153.9 किमी प्रतितासानं चेंडू टाकला होता. परंतु, त्यानंतर उमरान मलिकनं 154 किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकत हा रेकॉर्ड तोडला. त्यानंतर 5 मे रोजी दिल्लीविरुद्ध तब्बल 157 किमी प्रतितासानं चेंडू टाकत उमराननं स्वत:चाच रेकॉर्ड तोडला. दुसरीकडे संघात पहिल्यांदाच स्थान मिळालेल्या अर्शदीपने यंदा 14 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ


केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उम्रान मलिक.


हे ही वाचा -