Ranji Trophy 2022 Knockout : रणजी ट्रॉफी 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने आजपासून (6 जून) सुरु होत आहेत. यामध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी आठ संघांमध्ये लढत होणार आहे. हे चार सामने 6 ते 10 जून दरम्यान बंगळुरुमध्ये खेळवले जातील. सर्व सामने सकाळी साडेनऊ वाजता सुरु होतील. पण येत्या चार दिवसांत बंगळुरुमध्ये मुसळधार पाऊस आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या संघांना स्पर्धेच्या पुढील फेरीत धडक मारायची आहे, त्यांच्यासाठी हे चांगलं लक्षण नाही.


या संघांमध्ये लढत होणार  
बाद फेरीत बंगालचा सामना झारखंडशी, मुंबईचा सामना उत्तराखंडशी, कर्नाटकचा उत्तर प्रदेशसोबत आणि पंजाबचा मध्य प्रदेशसोबत सामना होणार आहे. या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये साखळी फेरीचा टप्पा पार पडला. कोरोना महामारीमुळे प्रत्येक संघ स्पर्धेतील जास्तीत जास्त तीन सामने खेळले. आता बंगाल, मध्य प्रदेश, मुंबई, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंड हे आठ संघ रणजी ट्रॉफीसाठी एकमेकांशी भिडणार आहेत.


उपांत्य फेरी 1 - बंगाल विरुद्ध झारखंड
बाद फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी एलिट ग्रुप ब मधील तीनही सामने जिंकणारा बंगाल हा एकमेव संघ आहे. उपांत्यपूर्व सामन्यात नागालँडचा पराभव करुन बाद फेरीत प्रवेश करणाऱ्या झारखंडविरुद्ध फेव्हरिट म्हणून मैदानात उतरेल. पण बंगालचा संघ मोहम्मद शमीशिवाय खेळण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमीला जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी संघात विश्रांती दिली जाऊ शकते.


अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू अभिषेक पोरेलला बाद फेरीत संधी दिली जाण्याची अपेक्षा आहे. बंगालची मदार त्यांचे वेगवान गोलंदाज आकाश दीप, इशान पोरेल आणि मुकेश कुमार यांच्यावर आहे, ज्यांनी साखळी फेरीत 48 विकेट्स घेतल्या होत्या.


दुसरीकडे, झारखंड 2016-17 नंतर प्रथमच बाद फेरीत खेळत आहे. त्यांचा उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास चढ-उताराचा होता. दिल्लीवर 15 धावांनी विजय मिळवल्यानंतर छत्तीसगडचा आठ विकेट्सनी पराभव केला. महत्त्वाच्या सामन्यात तामिळनाडूवर दोन विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठण्यासाठी झारखंडने कठोर संघर्ष केला.


सौरभ तिवारी, विराट सिंह, कुमार कुशाग्र, कुमार सूरज, सुशांत मिश्रा, शाहबाज नदीम और अनुकुल रॉय, झारखंड संघातील हे खेळाडू बंगालला आव्हान देऊ शकतात


उपांत्य फेरी 2 - मुंबई विरुद्ध उत्तराखंड
मुंबईचा संघ शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेशिवाय खेळणार आहे. दुखापतीमुळे दोघेही संघाबाहेर आहेत. तरीही 41 वेळ चॅम्पियन ठरलेल्या मुंबईकडून उत्तराखंडपेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील संघाने मुंबईच्या कधीही न पराभूत झालेल्या वृत्तीची काही झलक दाखवली, कारण तनुष कोटियनने खालच्या फळीतील फलंदाजांसह कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 98 धावा केल्या आणि शम्ससह गोव्यासाठी 232 धावा केल्या, ज्याच्या नंतर मुलानीने सामन्यात 11 बळी घेतले.


तीन मोसमात दुसऱ्यांदा बाद फेरी खेळणाऱ्या उत्तराखंडने आंध्र प्रदेश, सर्व्हिसेस आणि राजस्थानला मागे टाकत बाद फेरी गाठली आहे. उत्तराखंडचा कर्णधार जय बिस्ता आणि मुंबईचा माजी खेळाडू, उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि आपल्या पूर्वीच्या संघाविरुद्ध चांगली खेळी खेळण्यासाठी तो उत्सुक आहे.


उपांत्य फेरी 3 - कर्नाटक बनाम उत्तर प्रदेश
आर विनय कुमार आणि अभिमन्यू मिथुन निवृत्त झाल्यामुळे आणि प्रसिद्ध कृष्णा एजबॅस्टन कसोटीला जात असल्याने उपांत्यपूर्व फेरीत खेळू शकला नाही.  तर रोनित मोरेच्या नेतृत्वात कर्नाटकचे वेगवान गोलंदाजांचं आक्रमण फारसं प्रभावी ठरणार नाही. असं असलं तरी कर्नाटकची ताकद त्यांच्या फलंदाजीत आहे, जी मयंक अग्रवालच्या समावेशाने आणखी वाढली आहे. आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना खराब फॉर्म आणि एजबॅस्टन कसोटीसाठी भारतीय संघातून बाहेर पडलेला मयांक अग्रवाल चांगल्या खेळीच्या अपेक्षेत आहे. याशिवाय देवदत्त पडिक्कल, करुण नायर, मनीष पांडे गौतम, जे सुचित आणि श्रेयस गोपाल हे त्याला फलंदाजीत मदत करतील.


दुसरीकडे, उत्तर प्रदेशने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्रावर विजय मिळवला. आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससोबत यशस्वी हंगाम गाजवलेला रिंकू सिंह सहा डावात 300 धावांसह प्रमुख फलंदाज आहे. यश दयाल आणि मोहसीन खान या युवा वेगवान गोलंदाजांसह प्रियम गर्ग आणि अक्षदीप नाथ हे फलंदाजीची जबाबदारी घेत कर्नाटकसमोर कडवं आव्हान उभं करु शकतात.


उपांत्य फेरी 4 - पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश
पंजाबमध्ये तरुणाई आणि अनुभव यांचा उत्तम संगम आहे. मनदीप सिंह, गुरकीरत सिंह आणि सिद्धार्थ कौल दीर्घकाळ संघात आहेत तर अभिषेक शर्मा, रमणदीप सिंग, अनमोल मल्होत्रा, अनमोलप्रीत सिंह आणि प्रभसिमरन सिंह यांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. उपांत्यपूर्व फेरीत एजबॅस्टन कसोटीसाठी निवड झाल्यानंतर शुभमन गिलच्या समावेशामुळे त्यांची फलंदाजी मजबूत होईल, पण मयंकला मार्क डे आणि अभिषेककडून चांगल्या गोलंदाजीची आशा असेल.


दुसरीकडे, मध्य प्रदेशला हलक्यात घेता येणार नाही. रजत पाटीदार आणि कुमार कार्तिकेय सिंग आयपीएल 2022 संपल्यानंतर रणजी स्पर्धेत येत आहेत. केरळविरुद्धच्या पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे मध्य प्रदेशने बाद फेरी गाठली, जे स्पर्धेच्या पुढील टप्प्यात पोहोचण्याच्या जवळ आहे. सलामीवीर यश दुबेने कारकिर्दीतील सर्वोत्तम 289 आणि पाटीदारने 142 धावा केल्या. शुभम शर्मा आणि ईश्वर पांडे यांच्या साथीने मध्य प्रदेश पंजाबविरुद्ध आपली ताकद दाखवू शकतो.