IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला (IPL 16) सुरुवात होण्यापूर्वी सनरायजर्स हैदराबादच्या (SunRisers Hyderabad) संघात मोठा बदल पाहायला मिळतोय.  सनरायजर्स हैदराबादनं वेस्ट इंडीजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराकडं (Brian Lara) संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्य प्रशिक्षक टॉम मूडीज आणि सनरायजर्स हैदराबाद संघानं परस्पर संमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर गेल्या मोसमात संघाचा धोरणात्मक सल्लागार आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणाऱ्या लाराला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलंय.


नुकतंच हैदराबादच्या संघानं त्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ब्रायन लाराची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आल्याची माहिती दिली. "सनरायझर्स हैदराबाद मुख्य प्रशिक्षक टॉम मूडीसोबत आमचा करार संपत आहे. हैदराबादच्या संघासाठी टॉम यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानू इच्छितो. गेल्या अनेक वर्षांमध्ये हा खूप आनंददायी प्रवास आहे आणि आम्ही त्याला भविष्यातील प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो."


ट्वीट-



हैदराबादच्या संघासाठी टॉम मूडी यांचं योगदान
टॉम मूडी 2013 ते 2019 पर्यंत संघाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक होते. यादरम्यान त्यांचा संघ पाच वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आणि 2016 मध्ये विजेतेपदही जिंकलं. 2020 मध्ये 56 वर्षीय ट्रेव्हर बेलिस यांची मूडी यांच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु, मूडी संघातच राहिले आणि त्यांना संघाचे संचालक बनवण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा टॉम मूडी यांच्या खांद्यावर संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आयपीएल 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबादची कामगिरी निराशाजनक होती आणि टॉम मूडीच्या मार्गदर्शनाखाली संघानं 14 पैकी केवळ सहा सामने जिंकले आणि गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहिला.


ब्रायन लाराची कारकिर्द
ब्रायन लारानं त्याच्या कारकिर्दीत 133 कसोटी आणि आणि 299 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं कसोटीत 34 शतके आणि 48 अर्धशतकांसह 11 हजार 953 धावा केल्या आहेत. ज्यात दोन द्विशतकाचाही समावेश आहे. त्यानं 1994 मध्ये इंग्लंडविरुद्ध 375 आणि 2004 मध्ये 400 धावांची नाबाद खेळी खेळली होती. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती. कसोटी क्रिकेटमध्ये 400 करण्याचा विक्रम आजही त्याच्या नावावर अबाधित आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ब्रायन लाराच्या नावावर 10 हजार 405 धावांची नोंद आहे. ज्यात 19 शतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 53 शतकांसह 22 हजार 358 धावा केल्या आहेत. 


हे देखील वाचा-