No Ball : क्रिकेट कारकिर्दीत कधीही 'नो बॉल' न टाकणारे गोलंदाज
संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत कधीच नो बॉल टाकला नाही असेही काही गोलंदाज आहेत. यामध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचाही समावेश आहे.
Cricket News : क्रिकेट हा अनिश्चितचेचा खेळ आहे. तेथे सामन्यात काय होईल कधी काही सांगू शकत नाही. एक चेंडू, एक फटका आणि एक झेल सामन्याचं संपूर्ण चित्रच पालटून टाकतो. अशा या खेळात प्रत्येक पद्धतीच्या बॉलला एक वेगळं असं महत्त्वं असतं. अशा या खेळात नो बॉलमुळंही सामन्यांची चित्र बदलल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. पण, तुम्हाला माहितीये काही खेळाडू असेही आहेत ज्यांनी त्यांच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत कधीच नो बॉल टाकला नाही.
कपिल देव
भारतीय क्रिकेट संघात ऑल राऊंडर म्हणून ओळखले जाणारे कपिल देव यांनी त्यांची क्रिकेट कारकिर्द खऱ्या अर्थानं गाजवली. त्यांनी गोलंदाजी करताना कधीही नो बॉल टाकला नाही.
इयान बोथॅम
इंग्लंडच्या संघातून खेळणाऱ्या इयान बोथॅम यांनी कायमच क्रीडा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 16 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी केव्हाही नो बॉल टाकला नाही.
इमरान खान
जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणजे पाकिस्तानच्या संघातील माजी खेळाडू इमरान खान. पाकिस्तानच्या संघाचं पहिल्यांदाच विश्वचषकात नेतृत्त्वं करणाऱ्या या खेळाडूनं क्रिकेट कारकिर्दीत कधीही नो बॉल टाकला नाही.
डेनिस लिली
क्रिकेट रसिकांमध्ये डेनिस लिली यांनाही विशेष स्थान. शिस्तप्रिय गोलंदाज म्हणून त्यांची ओळख. लिली यांनीही कधीच त्यांच्या कारकिर्दीत नो बॉल टाकला नाही.
लांस गिब्स
वेस्ट इंडिजच्या संघातील लांस गिब्स त्यांच्या कारकिर्दीत 79 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळले. कसोटी सामन्यात 300 गडी बाद करण्याचा टप्पा गाठणारे ते पहिलेच खेळाडू. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केव्हाही नो बॉल टाकला नाही.