एक्स्प्लोर

Prithvi Shaw : पृथ्वी शॉमुळे खाल्ली जेलची हवा, तुरुगांतून बाहेर आल्यावर वाढवली क्रिकेटरची अडचण; कोण आहे सपना गिल?

Who is Sapna Gill : पृथ्वी शॉसोबतच्या (Prithvi Shaw) वादामुळे सपना गिलला जेलची हवा खावी लागली. तुरुगांतून बाहेर आल्यावर मात्र तिने पृथ्वीची अडचण वाढवलीय. कोण आहे सपना गिल? जाणून घ्या.

Bombay HC sent notice to Prithvi Shaw : क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2023 (IPL 2023) मध्येही त्याला काही खास कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे क्रिकेटमधील खराब फॉर्ममुळे संकटात सापडलेल्या पृथ्वी शॉच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सपना गिल (Sapna Gill) सेल्फी वाद प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वी शॉला नोटीस पाठवली आहे. पृथ्वी शॉसह 11 जणांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी आता त्यांना लवकरात लवकर उत्तर द्यावं लागणार आहे. 

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पृथ्वी शॉचा एका तरुणीसोबतचा बाचाबाचीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मुळात सेल्फी घेण्यावरून हा वाद सुरु झाला होता, मात्र आता हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. पृथ्वी शॉने सपना गिलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर सपना गिलला तुरुंगात जावं लागलं. त्यानंतर तिला या प्रकरणी जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर सपनाने पृथ्वीच्या अडचणी वाढवल्या आहेत. तिच्यावरील दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यानंतर सपनाच्या मागणीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वी शॉसह 11 जणांना नोटीस पाठवली आहे.

Who is Sapna Gill : कोण आहे सपना गिल?

सपना गिल भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सपना तिचं ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सपना गिल सध्या 26 वर्षांची आहे. सपनाचा जन्म पंजाबची राजधानी चंदीगड येथे झाला. सपनाने 'काशी अमरनाथ' आणि 'निरहुआ चलल लंदन' या चित्रपटांमध्ये भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अद्याप एवढी प्रसिद्धी मिळाली नसली. तरी पृथ्वी शॉसोबतच्या वादामुळे सपना गिल चर्चेत आली आहे.

Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case : काय आहे प्रकरण?

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याचा एका तरुणीसोबत वाद झाला. मुंबईतील हॉटेल बाहेर ही घटना घडली. सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाला असल्याचं समोर आलं. पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढताना हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना जोगेश्वरी लिंक रोड येथील लोटसच्या पेट्रोल पंपाजवळ घडल्याची माहिती आहे. पृथ्वी शॉच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ याचा एका हॉटेलात पार्टी सुरु असताना सेल्फी काढण्यावरुन वाद झाला. त्यानंतर हॉटेलमधून शॉ दुसऱ्या कारने घराकडे निघाला होता. त्यादरम्यान त्याच्या मित्राच्या कारमध्ये तो असल्याचं संबधितांना वाटलं आणि तरुणी आणि तिच्या मित्रांनी त्या कारवर हल्ला केला. त्यानंतर दुसरा व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये तरुणी आणि पृथ्वीमध्ये वाद सुरु होता. या प्रकरणावरुन पृथ्वीच्या मित्रांनी ओशिवरा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यावरुन संबंधित तरुणी आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर सपनाला आधी अटक आणि नंतर तिची सुटका करण्यात आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prithvi Shaw : IPL सुरु असताना पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ, 'त्या' प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरीZero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Special Report on Aaditya Thackeray : दिशाच्या वडिलांची याचिका, आदित्य ठाकरे अडचणीत येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget