T20 World Cup 2022: टीम इंडियानं (Team India) ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपली मोहीम तीव्र केलीय. दरम्यान, टी-20 विश्वचषकासाठी सोमवारी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आलीय. यातच टीम इंडिया जर्सीबाबत (Team India Jersey) महत्वाची माहिती समोर आलीय. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत किट भागीदार 'एमपीएल स्पोर्ट्स'नं एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये टीम इंडिया टी-20 विश्वचषकात नव्या जर्सीत दिसणार आहे. ज्यानंतर टीम इंडियाची जर्सी कशी असेल? याबाबात चाहत्यांमध्ये उस्तुकता लागली आहे. यापूर्वी टीम इंडियाच्या टी-20 संघानं लॉन्च केलेली रेट्रो जर्सी चाहत्यांना खूप आवडली होती.
'एमपीएल स्पोर्ट्स'नं शेअर केलेल्या व्हिडिओत रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या दिसत आहे. या व्हिडिओत रोहित म्हणतोय की, चाहत्यांनीच आम्हाला क्रिकेटर बनवलंय. तर, श्रेयस म्हणतोय की, चाहते ज्या प्रकारे खेळाडूंचा उत्साह वाढवतात, त्याच्याशिवाय खेळामध्ये मजा नाही येत. टीम इंडियाच्या नव्या जर्सीचा भाग बनण्यासाठी तयार व्हा, असं हार्दिक पांड्या बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी टीम इंडियाची जर्सी कशी असावी? याबाबत सल्ले देण्यास सुरुवात केलीय. काही चाहते आकाशी रंगाच्या जर्सीची मागणी करत आहेत. तर, 2007 च्या विश्वचषकात घालण्यात आलेली जर्सी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या अंगावर पाहायला मिळेल, अशीही चाहत्यांकडून अपेक्षा केली जात आहे.
एमपीएलचा व्हिडिओ-
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.
आस्ट्रेलियाच्या प्रमुख शहरात पार पडणार स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-