BCCI Team India Players Family New Guidelines : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरीनंतर बीसीसीआय टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत थोडे कठोर धोरण घेण्याच्या मनःस्थितीत आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या परदेश दौऱ्यांसाठी नवीन नियम लागू केली आहेत. बोर्डाने नियमांमध्ये केलेल्या बदलांनुसार, आता खेळाडूंना परदेश दौऱ्यावर त्यांच्या पत्नीसोबत जास्त वेळ राहू शकत नाहीत.
टीम इंडियाच्या अलीकडील कामगिरीनंतर बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचलले आहे. गेल्या 3 महिन्यांत रोहित शर्मा आणि त्याच्या टीमसाठी चांगले गेले नाही. सुरुवातीला त्यांना घरच्या मैदानावर न्यूझीलंडने 3-0 असा पराभव पत्करावा लागला. नंतर ऑस्ट्रेलियामध्ये 1-3 असा पराभव पत्करावा लागला. यासह, टीम इंडिया पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा फेल ठरले. आता बीसीसीआयने खेळाडूंसाठी काही नवीन नियम लागू केली आहेत.
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे कठोर पाऊल
नवीन नियमांनुसार, 45 दिवसांच्या दौऱ्यात खेळाडूंच्या पत्नी आणि कुटुंबियांना जास्तीत जास्त दोन आठवडे राहण्याची परवानगी असेल. यापूर्वी, संपूर्ण दौऱ्यात कुटुंबातील सदस्यांना खेळाडूंसोबत जाण्याची परवानगी होती. बॉर्डर-गावसकर मालिकेदरम्यान अनुष्का शर्मा (विराट कोहलीची पत्नी) आणि अथिया शेट्टी (केएल राहुलची पत्नी) यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंच्या या दौऱ्यावर स्टेडियमवर दिसल्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, नवीन धोरणानुसार आता हे करता येणार नाही.
टीम इंडियासाठी बीसीसीआयचे नवीन नियम काय?
- आता संपूर्ण दौऱ्यात पत्नी क्रिकेटपटूंसोबत राहू शकणार नाहीत.
- एखादा दौरा 45 किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांची असेल, तर खेळाडूंच्या कुटुंबाला फक्त 14 दिवस त्या दौऱ्यावर राहण्याची परवानगी असेल, त्यापेक्षा जास्त नाही.
- प्रत्येक खेळाडूला टीम बसने प्रवास करावा लागेल, वेगळा प्रवास करण्याची परवानगी नाही.
गेल्या 2-3 वर्षांत तुम्ही अशा बातम्या अनेकदा ऐकल्या असतील की, टीम इंडियाचे काही खेळाडू वेगळे प्रवास करत आहेत आणि ते संघासोबत बसमध्ये प्रवास करत नाहीत. पण, आता हे होणार नाही.
हे ही वाचा -