BCCI Pay Cut India Players : काम दाखवा अन् दाम मिळवा! BCCIचा 'तो' निर्णय, रोहित-विराटच्या खिशाला कात्री? खेळाडूंना मिळणार इतके पैसे
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवामुळे बीसीसीआय खूप नाराज आहे. अलिकडच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढवण्यावरही चर्चा झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीसीसीआयला खेळाडूंनी पराभवाची जबाबदारी घ्यावी असे वाटते आणि त्यामुळे ते मोठा निर्णय घेऊ शकते. या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर उपस्थित होते.
वृत्तानुसार, या आढावा बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, आता खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार पगार देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली या प्रमुख खेळाडूंना काम दाखवा अन् दाम मिळवा हा नियम लागू होऊ शकतो.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, खेळाडूंना त्यांच्या कामगिरी सुधारावी लागेल अन्यथा त्यांना पूर्ण पगार दिला जाणार नाही. म्हणजे जर एखाद्या खेळाडूची कामगिरी अपेक्षेनुसार नसेल तर त्याचा त्याच्या कमाईवर परिणाम होईल.
गेल्या वर्षी, बीसीसीआयने आपल्या कसोटी खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी एक नवीन प्रणाली सुरू केली होती. याअंतर्गत, 2022-23 हंगामात एका हंगामात 50% पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी 30 लाख रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन मिळेल.
एका हंगामात किमान 75 टक्के सामन्यांमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी ही रक्कम एक सामना 45 लाख रुपयांपर्यंत वाढेल.
सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआयच्या आढावा बैठकीत काही खेळाडू कसोटी क्रिकेटला कमी महत्त्व देत आहेत यावरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली. ते याकडे गांभीर्य दाखवत नाहीत.
भारत कसोटी सामना हरल्यावर सध्याच्या संघातील काही खेळाडूंना खूप निराशा होते यावर चर्चा झाली. संघ व्यवस्थापनाला कसोटी क्रिकेटचे महत्त्व समजते, पण बरेच खेळाडू त्याला फारसे महत्त्व देत नाहीत.