IND vs PAK,  Asia Cup 2023 : क्रिकेट जगतातील सर्व क्रिकेटप्रेमी वाट पाहणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK). आता या सामन्याचा आनंद पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. कारण आगामी आशिया कप 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत दोन्ही संघ एकाच गटात असणार आहेत. नुकतीच आशिया कप संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कप 2023 साठी भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सेक्रेटरी जय शाह यांनी गुरुवारी 2023-24 या वर्षासाठीचे क्रिकेट कॅलेंडर शेअर करताना सांगितलं आहे. त्यात सामन्यांचे वेळापत्रक ही त्यांनी शेअर केलं आहे. यावेळी आशिया चषक एकदिवसीय स्वरूपात खेळवला जाणार असून तो सप्टेंबरमध्ये आयोजित केला जाईल.


सध्या आशिया कपच्या यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानकडे आहे. मात्र बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याआधीच टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित केली जाऊ शकते अशीही माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


यंदा आशिया कप एकदिवसीय स्वरुपात


यावेळची आशिया कप स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असून एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी आशिया कप स्पर्धेच्या एका गटात भारत, पाकिस्तानसह क्वालिफायर 1 चा संघ असेल. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत. यामध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कपमध्ये 6 सुपर 4 सामने होणार आहेत. यानंतर डिसेंबरमध्ये 19 वर्षाखालील पुरुष आशिया चषक स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे. शेड्यूल शेअर करताना जय शाह यांनी लिहिले, "2023 आणि 2024 या वर्षासाठीचं क्रिकेट कॅलेंडर सादर करत आहे. या खेळाला नवीन उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.






हे देखील वाचा-