IND vs SL T20I: वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारतानं दोन धावांनी विजय मिळवला. यासाह तीन सामन्याच्या टी20 मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आज पुण्यात दुसरा टी 20 सामना होत आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे.
भारतीय संघात दोन बदलाची शक्यता -
पहिल्या टी 20 सामन्यादरम्यान संजू सॅमसनला दुखापत झाली होती. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत माहिती समोर आली नाही. पण संजू सॅमसन तंदुरुस्त नसल्यास भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत राहुल त्रिपाठीला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकला होता. तो तंदुरुस्त झाल्यास संघात पुनरागमन करेल, अशात हर्षल पटेल याला वगळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पुण्याच्या मैदानावर सामना होत असल्यामुळे लोकलबॉय ऋतुराज गायकवाडला संधी मिळणार का? याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं असेल.
पहिल्या सामन्यात काय झालं होतं?
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात दोन धावांनी थरारक विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेला अखेरच्या चेंडूवर चार धावा हव्या होत्या. त्यावेळी दिलशान मदुशंका रनआऊट झाला आणि हा थरारक सामना भारताने दोन धावांनी जिंकला. शिवम मावीने चार विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये पाच बाद १६२ धावा केल्या. दीपक हुडाने २३ चेंडूंमध्ये नाबाद ४१ तर अक्षर पटेलने २० चेंडूंमध्ये नाबाद ३१ धावांची खेळी केली. श्रीलंकेला २० षटकांमध्ये १६० धावांची मजल मारता आली.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील 18 सामने भारतानं जिंकले आहेत. तर, 8 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आलाय. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय. भारतानं घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत एकूण 15 टी-20 सामने खेळले आहेत. यातील 12 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, दोन सामन्यात श्रीलंकेच्या संघाला बाजी मारता आली. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरलाय.
भारताचा टी-20 संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.
श्रीलंकेचा टी-20 संघ:
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.