India vs Sri Lanka Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या टी20 मालिकेत भारत 1-0 च्या आघाडीवर आहे. पहिला सामना 2 धावांनी जिंकत भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊ शकतो. आजचा हा दुसरा टी20 सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA Stadium) क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.. तर आजच्या सामन्याची माहिती जाणून घेऊ...
कधी होणार सामना?
भारत विरुद्ध श्रीलंका हा दुसरा टी20 सामना आज अर्थात 5 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
हा भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी20 सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA Stadium) क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
भारताचा टी20 संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन (दुखापतग्रस्त), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
श्रीलंका टी20 संघ:
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा
भारत विरुद्ध श्रीलंका Head to Head
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत. यातील 18 सामने भारतानं जिंकले आहेत. तर, 8 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आलाय. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय.
हे देखील वाचा-