ICC Women’s T20 World Cup 2024 : यावेळी बांगलादेश आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चे आयोजन करत आहे. पण बांगलादेशात आरक्षणाच्या आंदोलनामुळे देशात खळबळ उडाली आहे. त्यामुळे बांगलादेश टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद गमावू शकते. त्याचबरोबर बांगलादेशातील परिस्थितीवरही आयसीसी सतत लक्ष ठेवून आहे. 


दुसरीकडे, टी-20 वर्ल्ड कप भारत, श्रीलंका किंवा यूएईमध्ये आयोजित केला जाऊ शकतो, असे वृत्त समोर आले होते. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) भारताला वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्याची विनंती केली होती. आता बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे.


टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना जय शाह म्हणाले की, "त्यांनी बीसीसीआय महिला टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करू शकता का, असे विचारले होते, परंतु मी स्पष्टपणे नकार दिला. त्यावेळी येथे पावसाळा सुरू असतो आणि पुढच्या वर्षी आम्हाला या स्पर्धेचे आयोजन करावे लागेल. आम्हाला महिला एकदिवसीय वर्ल्ड कप पण आयोजित करायचा आहे.






ICC लवकरच घेणार मोठा निर्णय!


बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या आयोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परिस्थिती चिंताजनक आहे आणि आयसीसी देखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर परिस्थिती लवकर सुधारली नाही तर आयसीसी या प्रकरणी मोठा निर्णय घेऊ शकते. ही स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान 2 मैदानांवर खेळली जाणार आहे.


दरम्यान, देशात होत असलेल्या आंदोलनामुळे बांगलादेश पुरुष संघाच्या सरावावरही परिणाम झाला. बांगलादेशचा संघ नियोजित कार्यक्रमापूर्वीच पाकिस्तानला रवाना झाला आहे. दोन्ही देशांदरम्यान दोन कसोटी सामने होणार असून ही मालिका 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. बांगलादेशचा संघ 17 ऑगस्टला पाकिस्तानला जाणार होता, पण इतर अनेक बाबी लक्षात घेऊन संघ 5 दिवस आधीच पाकिस्तानला गेला.


संबंधित बातम्या : 


गोंधळात गोंधळ, तिकीट विक्री सुरु केली नंतर ठरलं प्रेक्षकांना नो एंट्री, पाकिस्तानात प्रेक्षकांना पैसे परत देण्याची वेळ 


Jasprit Bumrah : बुम...बुम... बुमराहचं कमबॅक कधी? बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळणार का? मोठी अपडेट समोर