Jasprit Bumrah : बुम...बुम... बुमराहचं कमबॅक कधी? बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळणार का? मोठी अपडेट समोर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज दुलीप ट्रॉफीसाठी चार संघ जाहीर केले. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, आर. अश्विन आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आलेली आहे. जसप्रीत बुमराह गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजसप्रीत बुमराहनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी दमदार कामगिरी केली होती. त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. टी 20 वर्ल्डकपनंतर बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पीटीआयच्या सूत्रांनुसार जसप्रीत बुमराह बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत देखील खेळणार नाही.
जसप्रीत बुमराह थेट न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियात परतू शकतो. बीसीसीआय भारतीय संघाताली डावखुऱ्या गोलंदाजांच्या बाबतीत गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती आहे. यामध्ये अर्शदीप सिंग, खलील अहमद यांच्या नावाची चर्चा आहे.
अर्शदीप सिंग आणि खलील अहमद यांना बीसीसीआयनं यापूर्वी देखील संधी दिली होती. आगामी काळात देखील बीसीसीआय या दोघांच्या नावाचा विचार करेल, अशी शक्यता आहे.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून गोलंदाजी करणाऱ्या यश दयाळच्या नावाचा देखील बीसीसीआयकडून गांभीर्यानं विचार केला जात असल्याची माहिती आहे.